-
चिमूर व नागभीड तालुक्याच्या क्षेत्रात पसरलेले सात बहिणीचे डोंगर सर्वांना परिचित आहे.
या डोंगरांमध्ये स्थित उंच शिखर ज्याची उंची अंदाजे ५०० मी. असावी. या शिखर यालाच पेरजागड असे नाव आहे.
चिमूर ते तळोधी या रस्त्याने जात असताना एक उंच शिखर आपल्या नजरेस पडते. या शिखरापर्यंत पोचण्या करिता सारंगगड या गावापासून उत्तर दिशेला तीन किलोमीटर जंगलामधून प्रवास करावा लागतो. या पेरजागडा पर्यंत पोहोचण्याकरिता कच्चा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षांची गर्दी न्याहाळत जावे लागते.
या पेरजागडा संदर्भात कोणताही लेखी पुरावा नसला तरी दागोजी दडमल यांच्या सात कन्या होत्या. त्यांची नावे मुग्दाई, अबांई, निबांई, भिवराई, पवराई, उमाई, गवराई अशी होती.
यांच्या नावाने नागभीड चिमूर तालुक्याच्या क्षेत्रात पसरलेल्या डोंगराला सात बहिणीचे डोंगरचे म्हटले जाते.
विशेष म्हणजे या पेरजागडावर कोरलेल्या सात मुर्त्या आहेत. या सातही मुर्त्या सात बहिणींचे प्रतीक आहे, असे मानले जाते.
संकलन :-
संदीप धारणे,
मासळ.
|