Home

Google च्या काही महत्वपुर्ण ट्रिक्स

गुगलवर माहिती शोधण्याकरिता काही पद्घती.

  • गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यासाठी :

  • ०१) आपण सर्च बॉक्स मधे टाईप केलेल्या शब्दामधे ' + ' चिन्हाचा वापर करावा :
    समजा गुगलवर आपणास Windows 10 ची हिस्ट्री (उदा : विन्डोज 10 चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर सर्च बॉक्समधे ' Windows10 +History ' असे टाईप करुन सर्च केल्यास गुगलवर हे दोन्ही शब्द असलेलीच Pages गुगल आपल्याला समोर दाखवितो.
  • ०२) आपण सर्च बॉक्स मधे टाईप केलेल्या शब्दामधे किंवा आपल्या टाईप केलेल्या प्रश्नात ' - ' चिन्हाचा वापर करावा :
    समजा जर आपणास गुगलवर 'Kumar' असे शोधायचे असेल. पण येणाऱ्या यादीमध्ये 'Akshay' च्या माहितीची पाने सहज जास्त राहतील म्हणून . अशावेळी गुगलला एखादा शब्द शोधू नकोस हे जर सांगायचे झाल्यास मग 'Akshay -kumar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणाऱ्या उत्तरामध्ये 'Kumar" हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
  • ०३) मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी :
    बऱ्याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील उपयोगी माहितीमुळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का ते शोधण्यासाठी ' related: ' या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http:// www.gmail.com / ' असे शोधल्यास गुगल 'www.gmail.com ' प्रमाणेच माहिती असणाऱ्या वेबसाईटची यादी देईल.
  • ०४) आपल्या प्रश्नामध्ये ' * 'चिन्हाचा वापर करावा :
    गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर 'friend* ' असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.
  • ०५). आपल्या प्रश्नामध्ये ' ? ' चिन्हाचा वापर करावा :
    एखाद्या शब्दाचे पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? ' चिन्हाचा वापर करावा. उदा. 'Compute?' असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.व आपल्याला हवा असलेला शब्द मिळेल.
  • ०६) आपल्या प्रश्नामध्ये ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा :
    समजा आपल्याला दोन शब्दांना मिळून एकत्र सर्च करायचे असले तर अशा वेळी आपण 'AND अथवा Or' या दोन्ही शब्दाचा वापर करु शकतो.
    उदा. जर गुगल मध्ये सर्च करताना ' Computer or Books ' सर्च केल्यास गुगल ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असेल तीच पाने गुगल आपल्याला दाखवितो तर या उलट ' AND ' शब्दाचा वापर केल्यास गुगल ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.
  • ०७) आपल्या प्रश्नामध्ये ' 'चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणाऱ्या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो.
  • ०८) एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बऱ्याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो.उदा. ' www.facebook.com mobile ' असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com a mobile हा शब्द शोधेल.
  • ०९) एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास :
    आपल्याला जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असेल तर गुगल सर्च बॉक्स मधे त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे लिहल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. 'Define: Printer ' असे शोधल्यास गुगल आपल्याला ' Printer' या शब्दाचा अर्थ सांगणाऱ्या वेबसाईटची यादी देईल.
  • १०) एखादा शब्द जर आपल्याला जसाच्या तसा शोधायचा असल्यास :
    जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) वापर करावा. उदा. गुगलवर "contact us" असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी गुगल आपल्याला समोर देईल / दाखवेल.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट