-
चिमुर तालुक्यातील डोमा गावच्या पुर्वेस ३ किमी अंतरावर पेरजागडच्या कडकेपारीत सृष्टी सोदर्याने नटलेल्या अशा नयनरम्य व धबधब्याचे ठिकाण प्रेक्षनिय जागेत वसलेले आहे. त्या काळात डोमा येथे माना जमातीतील दडमलाची कन्या व श्रिरामेची सुन मुग्दाई राहत होती तिच्या पित्याचे नाव दागोजी व आईचे नाव कनकाई होते. मुग्दाईचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १०३५ (इ.स. १९१५) ला झाला. मुग्दाई या सातबहिनी होत्या. त्यांची नावे अबांई, निंबाई उमाई, गौराई, पवराई, भिवराई, मुग्दाई होते. त्यांचे प्रतिक म्हणुन पेरजागडच्या उंच शिखरास सात बहिनीचे डोगंर मनतात. वरच्या दगडात सात मुर्त्या कोरलेल्या आहेत.
बाराव्या शतकात इ.स. ११४० ते ११५० च्या दरम्यान नागवंशीय माना राजे व द्रविडवंशीय राजे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. या सत्ता नाग (माना) द्रविड यांच्या युद्धात मुग्दाईने उडी घेतली. हि विरांगना वाघिणीसारखी लढली. आणि शत्रुचा निःपात केला जमातीच्या रक्षणासाठी व मानांच्या मुक्तीसाठी मुग्दाईने पृखर झुंज दिली आणि लढता लढता धारातिर्थी पडली. व हौतात्म्य पत्करले. तिच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी म्हणजे मुग्दाईचे स्फुर्तीस्थान होय मुग्दाई देवस्थानासमोर दोन दगडी चिन्यामध्ये निसर्गनिर्मीत विहीर आहे. तिच्या खोलीचा अंत लागत नाही येथे दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी उत्सव साजरा करतात. या कार्यक्रमाला हजारो माना बाधंवाची उपस्थीती असते.
सदंर्भ :
माना जमातीचा सांस्कृतीक इतिहास लेखक. म.सी
संकलन :
संदीप धारणे, मासळ.
|