Home

कोलबा वाघ.

कोलबा वाघ.
  • स्वासात उठले वादळ डोळ्यात ओतली आग,
    पराक्रमी राजा आमचा लढवैया कोलबा वाघ,
    हातात घेतली तलवार घोड्यावरती स्वार.
    शूर वीर कोलबा राजा झाला युद्धाला तयार....।।धृ।।
  • इरवा टेकडीवरचा किल्ला भक्कम तटबंदि असलेला,
    जबाबदार त्या किल्याचा गंगारामजीना सोपविला,
    कोलबा वाघ निश्चिंत झाला, किल्ल्यावर मुक्काम केला,
    सैन्य घेऊन आगबा आला, इरवा किल्ला सर करण्याला,
    युद्ध झाले सुरु आगबा झाला रे
    शूर वीर कोलबा राजा झाला युद्धाला तयार....।।१।।
  • माणिका चरणी घेतली शपत, नागवंशी शूर आपली जमात,
    गडबोरी ची ही लढाई, कोलबा वाघ सेमाजी यांच्यात,
    कोलबाने वार केला, सेमाजीचा नाका कापला,
    सेमाजी रक्ताने लाल झाला, त्यांच्या सैन्याचा धुव्वा उडवीला,
    सैन्य घेऊन पळाला नकट्या नाकाचा सर
    शूर वीर कोलबा राजा झाला युद्धाला तयार....।।२।।

  • निखिल राणे
    मु. सूसा, तह-वरोरा.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट