Home

गणेश मंदिर.( बारसुर येथील )

गणेश मंदिर.
  • बारसूर येथील गणेशाची मूर्ती एकाच पांढऱ्या पाषाणावर निर्मित असून गणेशाचे हातात नाग आहे. हातात नाग असलेली गणेश मूर्ती देशातील एकमेव गणेश मूर्ती असावी.
    गणेश मंदिर आवारात असलेल्या सर्व मंदिरांची पडझड झालेली आहे. हे त्या ठिकाणी पडलेले पाषाण पाहून जाणवते. मूळ गणेशाचे मंदिर सुद्धा पडलेले आहे. गणेश मूर्ती जेथे स्थित आहे. तेथे नवीन मंदिर बांधणे चालू आहे.
    गणेश मंदिराचे बांधकाम बत्तीसा मंदिराप्रमाणे असल्यामुळे नागवंशीय राजानेच गणेश मंदिराची निर्मिती केली हे निश्चितपणे सांगता येते. पुरातत्त्व विभागाने जुन्या मंदिराप्रमाणेच बांधकाम करावयास पाहिजे होते, तसा दंडक आहे पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही.
    नागवंशीय राजाचे मंदिरात गणेशाची मूर्ती दर्शनी भागावर कोरलेली आढळून येते. त्यावरून प्रथम मान गणेशाला देत असावे. हातात नाग असलेली 'गणेशाची आगळीवेगळी मूर्ती इथेच आढळून येते.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट