Home

१३) अंत्यसंस्कार.

१३) अंत्यसंस्कार :-
  • या जमातीचे लोक मृत व्यक्तीला माती देतात, तर काहींना जाळतात. मृतांचे प्रेत सरणावर उत्तर-दक्षिण दिशेने पालथे करुन ठेवतात व अग्नी देतात. त्यानंतर सोयरा मृताच्या वडील मुलास पाण्यात डुबकी मारावयास लावून प्रेताच्या भोवताल प्रदक्षिणा मारुन प्रेताच्या डोक्याला बांबूच्या काठीने टोचून डोके फोडतो, त्यालाच 'कवटी फोडणे' असे म्हणत. नंतर सगळेजण मृत व्यक्तीच्या घरी परत येवून पाण्याचा गुरळा घेतात. मृत व्यक्तीच्या घरी तीन दिवस सुतक म्हणजे विटाळ पाळतात. या दिवसात जमातीतील लोक त्यांना जेवणाकरिता अन्न आणून देतात, त्याचेच ते जेवण करतात, त्यालाच कडूघाटा म्हणतात.
    प्रेतावर अंत्यसंस्कार करावयाच्या वेळी प्रेताला गरम पाण्याने आंघोळ घालतात. नविन वस्त्र नेसवतात , त्याच्या वस्तु त्याच्या सोबत ठेवतात. मृताचा मुलगा तिरडी धरतो, तिरडी तीन बांबूच्या काठ्या बांधून केलेली असते. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी प्रेत खाली ठेवतात. ती तिरडी एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात सुप असते. त्या सुपात चार-पाच कडधान्याच्या दाळी असतात. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी प्रेत ठेवून त्याची पूजा करुन मृताला दफन करतांना उत्तर-दक्षिण ठेवून माती टाकून बुजवून देतात व त्यावर पांढऱ्या रंगाचे दगड ठेवत, त्याला 'माती देणे' असे म्हणत.
    माना जमातीत एक वैशिष्ट्येपूर्ण दंडक आहे, तो म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गावातील जमातीतील प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीने हजर राहिलेच पाहिजे असा दंडक असून, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यासाठी अंत्यसंस्कार झाल्याबरोबर हजेरी घेतली जाते. हजर नसणाऱ्यांवर आर्थिक दंड ठोठावण्यात येत असे. आर्थिक दंड न भरणाऱ्यास सामाजिक बहिष्कार टाकल्या जात असे.
    मृताला माती दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी दाढी-मिशीचे व डोक्याचे केश काढून शुध्द केल्या जाते. त्याला 'चोकटिवा' म्हणतात. मृत व्यक्तीचा सोयरा मृत व्यक्तीच्या मुलाच्या हाती हराळी गवताची मुळी देवून महादेवाचे दर्शन घेवून त्यांना खांडसुपारी दिल्याशिवाय जेवण करत नसत. जेवण झाल्यानंतर मृतांच्या घरी थांबत नाही.
    तिसऱ्या दिवशी मृत व्यक्तीला शांती मिळावी म्हणून त्याला नैवद्य म्हणून द्रोणात शिजविलेले अन्न गावाच्या सिमेवर मृताचा मुलगा नेत असे. तेव्हा त्याच्या सोबत त्याचा सोयरा राहत असे. जमातीतील सधन लोक मृताचे शेवटचे कार्य म्हणुन २१ व्या दिवशी सर्व नातेवाईकांना निमंत्रित करुन गोड जेवन देत असत, त्यालाच "पाऊण मासा " असे म्हणत.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट