Home

मानोरा (सिं) येथील सर्वधर्मीय नागदिवाळी


  •         भद्रावती तालुक्यातील मानोरा (सिं) या गावात सर्व जाती धर्माचे लोक समुदायाने राहतात, एकुण ३१५ घर व १०५१ एवढी लोकसंख्या असलेल्या या गावाला आज विदर्भातील सर्व जाती-धर्मीय नागदिवाळी महोत्सव याचा मान आ. मा. ज. वि. यु. सं.विदर्भ शाखेने दिलेला आहे. याचा खूप खुप आनंद मानोरा गावातील समाजबांधव व ग्रामस्थांना होतो आहे. २०१२ पासून या गावाला रा. संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या संतांचे सर्व जाती-धर्म समभाव हे विचार गावातील लहान मुलांपासून तर वृद्धांच्या डोक्यात रुजलेले आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मानोरा गावात गावकर्‍यांच्या पुढाकाराने किंवा कोणत्याही समुदायाने वर्षातून घेण्यात येणारे कोणतेही सण-उत्सव, इतर कार्यक्रम समुदायिकरित्या साजरे करण्याचे एक मुख्य वैशिट्य आहे. यात गावातील प्रत्येक युवकांचे योगदान आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराबरोबरच फुले, शाहू, आंबेडकर, सावित्री, शिवाजी अशा अनेक महापुरुषांचे विचार ग्रामस्थामधी रुजवून ग्रामस्थांचे विचार परिवर्तन करण्याचे काम २०१६ ला संघटित झालेल्या आ.मा.ज.वि.यु.सं. ग्रामशाखा मानोरा च्या पदाधिकारी यांनी केले आहे.
            गेल्या २०१६ पासून माना जमातीच्या वतीने नागदिवाळी महोत्सव साजरा होतो आहे. बाकी गावांची नागदिवाळी सण पाहता एक जातीकेंद्री मानसिकता रुजविण्यासाठी व उत्सव उन्माद प्रदर्शित करण्यासाठी हा सण साजरा केला जातो का ? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. नागदिवाळी हा जरी नागवंशीय सण असला तरी गावात सर्वजण गुण्यागोविंदानं नांदत असल्याने या आदिवासीच्या सणांमध्ये इतर समाज बांधवांचे सहकार्य घेणे हे मानवतेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्वाची बाब आहे. ही बाब हेरून आम्ही तसे नियोजन आखले आणि त्याचा परिणाम असा झाला की, गावातील इतर जाती - धर्मीय लोकांचे तण, मन, धन चे सहकार्य मिळत आहे. नागदिवाळी हा सण फक्त माना जमातीचा नसून तो संपूर्ण मानोरावासीयांचा झालेला आहे. माना जमातीचा इतिहास संस्कृती ही प्रत्येक जाती धर्मीय लोकांना माहिती आहे. याचे कारण म्हणजे नागदिवाळी महोत्सवाच्यानिमित्ताने सर्व गावकऱ्यांचे संघटन व सर्व जाती-धर्म समभाव टिकून, एकत्रितरित्या राहण्यासाठी परिवर्तनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून गावातीलच प्रत्येक जाती धर्माचे लोक मंच्यावर एकत्रित येऊन आप-आपले विचार नागदिवाळी कार्यक्रमात मांडतात. भाऊरावजी नागोशे, विजय शिडाम, महानंदाताई ढोके, रोैफखा पठाण, साधनाताई लभाने, किरणजी डांगे, वंदनाताई पेचे, एकनाथ गौरकर, द्रौपदी हनवते, वंदनाताई तिमांडे, वर्षाताई गाढवे, समीक्षा भट अशा अनेक जातीधर्मीय पाहुण्यांचे सहकार्य या गावातील नागदिवाळीला होते आहे.
            गांव माझा मी गावाचा एकच ध्यास ग्रामस्वर्गाचा असा विचार ग्रामस्थामध्ये रुजलेला आहे. याचे श्रेय आ.मा.ज.वि.यु.सं. ग्रामशाखा मानोरा ला जाते आहे. वैष्णवी हनवते, अनंता नागोशे, सूनिल हनवते, संदीप दडमल, प्रगती नागोशे, राजेंद्र बगडे, दीपाली हनवते, अविनाश नागोशे, रविना नागोशे, किशोर दडमल, नूतन राणे, निखिल नागोशे, स्वप्नील दडमल, जोशना गजभे, आशिष जीवतोडे, प्रियंका जीवतोडे, विवेक हनवते, प्रियंका श्रीरामे, विजय नन्नावरे, वैशाली नन्नावरे, आशिष दडमल, किशोर नागोशे, वैभव नागोशे, सूरज हनवते तसेच सल्लागार मनोज हनवते, अर्चना नन्नावरे, भाऊराव नागोशे, जोत्सना जीवतोडे यांच्या सर्वाच्या सहकार्याने हा समाजाच्या उद्धाराचा विडा आमच्या ग्रामशाखेने उचलला आहे.
            या गावातील युवा ग्रामसुधारनेसाठी कार्य करतो आहे. याचा माझ्या मानोरावासीयांना खूप आनंद होतो आहे. पुन्हा भविष्यात सुंदर माझ्या मानोरा गावात नवनवीन उपक्रम, परिवर्तनात्मक कार्यक्रम घेऊन सर्व जातीधर्म समभावाने नांदावे या करिता आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना मानोरा कटिबद्ध राहिल.
                                                                                  • अनिल हनवते, मानोरा (ग्रामशाखा - अध्यक्ष )

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट