-
गत कालीन चार पाच वर्षात आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या माध्यमातुन संपुर्ण विदर्भातील माना जमातीचे सामाजिक संगठन बांधण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो वरकरणी यशस्वीही ठरला.या दरम्यान विदर्भातील संपूर्ण माना जमात पिंजून काढण्याचे ऐतिहासिक काम संघटनेच्या जिद्दिने पेटलेल्या कार्यकर्त्यांनी केले.
हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं ।
हमारी कोशिश ये है की सुरत बदलनी चाहिए ।
आग हो कही तो लेकीन आग जलनी चाहिए ।।
या उक्ती प्रमाणे प्रामाणिक उद्देश घेऊन समाज ढवळून काढून गावागावात ग्रामशाखा तयार करुन संघटनात्मक बांधणी केली गेली. दरम्यान हे करीत असतांना संघटनेचा स्वतःचा उदेश निश्चित होता. तिची स्वतंत्र विचारप्रणाली होती.आणि त्या आधारावरच हा सगळा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न होतोय. या सगळ्या डावातील एक घटक गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामशाखेचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.
सर्वांना सांभाळून घेणार्या नंदलाल गरमडे भाऊच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या ग्राम शाखेचे मुलं, यामध्ये सोपान घरत, प्रफुल गरमळे, पल्लवी घोडमारे, गोवर्धन घोडमारे, चरण वाघ, नरेश वाघ,राकेश घोडमारे, अनिकेत चौधरी, रिना श्रीरामे, जगदीश घोडमारे, रोशन श्रीरामे, अश्विनी गरमडे, प्रणय घोडमारे, प्रफुल ढोक, आचल घोडमारे,पपिता डोक,रुपाली ढोक, तुषार घरत, टाऊन परत, विलास वाकडे, शीतल पोडमारे, लीलाधर घरत, नंदु धारने, संजना घरत, हर्षा श्रीरामे, मनीष, मयूर घोडमारे, लोचन चौखे, लोचन घोडमारे, अतुल घोडमारे, हंशिका नन्नावरे, मयूर घरत, महेंद्र घोडमारे, वैभव चौके, सोनम नारनवरे, छत्रपाल घोडमारे, सेजल चौके, सल्लागार - योगेश ढोक सुभाष चौके, भास्कर घोडमारे, सौ. अल्काबाई दडमल,सौ.सविता श्रीरामे हे सर्व गावातील मुलं महत्वाची कामे उत्तमरीतीने पार पाडत आहेत.
त्यात खालील गोष्टिंचा विशेष उल्लेख करावा लागतो.
०१) गडचिरोली जिल्ह्यातील पहिली प्रामशाखा.
०२) गडचिरोली जिल्ह्यात इतर गावांना संघटनासाठी प्रेरीत करणारी ग्रामशाखा.
०३) गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनेचा पहिला कार्यक्रम देलनवाडीलाच.
०४) नागदिवाळी सह माना जमातीचे सर्व सण व थोरांच्या जयंती-पुण्यतीथ्या ( राष्ट्रीय कार्यक्रम ) नियमीत साजरे केले जातात.
०५) वरील आयोजीत कार्यक्रमांमध्ये सर्व आदिवासी जमाती सर्व जाती - धर्माचा सहभाग या माध्यमातून गावामध्ये स्वतःची
पत निर्माण केली. ( समानता व सहभागिता )
०६) स्वतःच स्वतंत्र पासबुक, चेकबुक, रबर स्टॅम्प असणारी ग्रामशाखा.
०७) सर्व सभांचा अहवाल व हिशोब असणारी ग्रामशाखा ( पारदर्शक )
०८) प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो अल्बम मध्ये लावुन सगळे क्षण जीवंत ठेवणारी ग्रामशाखा.
०९) प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्वच्छतेने करणारी ग्रामशाखा. ( सामाजिक द्रुष्टिकोन )
१०) ऐतिहासिक स्थळांना भेटी देणारी ग्रामशाखा ( ऐतिहासिक जागृती )
११) संघटनेच्या विशेष उपक्रमांपैकी एक मॅजिक या उपक्रमाकरीता पहिले वर्गणीदार भाऊरावजी घोडमारे हे देलनवाडीचेच. ( समाजाभिमुख )
१२) गावामध्ये लग्नसमारंभात जेवण वाढणे, मिळालेली रक्कम समाजहितासाठी खर्च करणे, वर - वधूंना माणिका देवीचा फोटो देणे. ( संस्कृती पुनरुज्जीवन )
१३) सामाजिक कामासाठी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्याला बाहेर जायचे असल्यास त्याला टिकिटचा खर्च देणे, सोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणे.
दिनांक ०७/१०/१९ च्या सभेत त्यांचा संकल्प.
०१) गावातील वाचनालय बंद अवस्थेत तिथे सगळे अभ्यासासाठी जाणार आहे.
०२) पुढील काळात मासिक बचत गोळा करणे व आर्थिक समृद्धीचे दृष्टीने नियोजन / कार्य करणे.
०३) पुढील ऐतीहासिक सहलीत माणिकगड ला भेट देणे.
वरील गोष्टी पाहता देलनवाडी ग्रामशाखा गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श ग्रामशाखा म्हणून उद्यास येत आहे. या सर्व मुलांचा आदर्श सुशिक्षित समाजबांधव व विद्यार्थी संघटनेच्या इतर सर्व ग्रामशाखांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना भविष्यास शुभेच्छा.....!
लेखन : सुहानंद ढोक व श्रीकांत.
|