Home

धन्य तू मुक्ताई माता

धन्य तू मुक्ताई माता
  • धन्य तू मुक्ताई माता स्तवली तुझी कीर्तिगाथा
    तूच आमुची पावन सरिता तव चरणी ठेवितसे माथा ।।१।।

    धन्य तू नागवंशी जन्मली अध्यात्माची ज्योत तेजविली
    स्वातंत्र्यास्तव रणी झुंजली मुक्ताई तूं पावन झाली ।।२।।

    पेरजागडच्या कडे कपारी विरगती प्राप्त जाहली
    ऐसा महिमा तुझा भुवरी नागसुते तुझी गायिली गाथा ।।३।।

    मुक्ताई तूच आमुची देवता तुझ्या कृपेनी होई सिद्धता
    तारी तू आपुल्या भक्ता तव चरणी ठेवितसे माथा ।।४।।

    माना गण तुझे स्तवन करी यास्तव सकला पावन करी
    देई कृपेची तू सावली मम प्रेरणा तव दिधली ।।५।।

    तुझे महात्म कैसे गाऊ ? तूझी उतराई कैसे होऊ
    तू तर आमुची स्फुर्ती दाता तव चरणी ठेवीतसे माथा ।।६।।



    गीतकार ( महादेव सि. जांभुळे) शिक्षक, ब्रम्हपुरी.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट