" साहसी - पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे " च्या माणुसकीला सलाम.👏 |
---|
आज दिनांक १३/०८/२०२२, वार - शनिवार ला दुपारी ०३:०० च्या सुमारातील प्रसंग बस स्टॉप जवळ शेगांव (बु.) त.- वरोरा जिल्हा - चंद्रपूर येथील
भारत पेट्रोलियम पंप जवळ पेट्रोल पंपावरून बाहेर निघत होतो. पेट्रोल पंपाच्या बाहेर निघण्याच्या मार्गावरील कडेला बसलेला एक म्हातारा धडकन चक्कर येऊन खाली पडला. बसलेला म्हातारा अचानक पडला म्हणून आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरड केली पण जवळ मात्र कोणी जात नव्हतं. माझ्या सोबत असलेल्या कुटुंबाला बाजूला ठेवून मीच म्हाताऱ्याच्या जवळ जाण्याची हिंमत केली. पडलेल्या म्हाताऱ्याला उठवून बसविला आणि दोन्ही हाताने कान दाबले कुणीतरी पाणी आणा असा आवाज दिला. अस्वस्त म्हाताऱ्याने पटापट उलटी करणे सुरू केली. त्या ठिकाणी शाळकरी सात-आठ मुली होत्या इतर अनेक प्रवासी, दुकानदार होते. त्यातील मुलींनी सी-बाप्पा, सी-बाप्पा म्हणत पळ काढला. इतर लोकांनी दुर्लक्ष केले. मात्र त्याच ठिकाणी असलेली साहस - 2022 प्रशिक्षणाची विद्यार्थिनी कु. पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे मु. वडधा ता.- वरोरा हिने साहस दाखवत धावत जावून त्या व्यक्तीसाठी पाणी आणून दिले. पाणी पाजल्यानंतर तो म्हातारा शुद्धीवर आला. मात्र त्याच्या सोबतच काय झाले हे त्यालाच माहीत नव्हते. त्यानंतर सर्व हकीकत सांगितली त्याचे सर्व कपडे भरलेले होते. ते धुण्यासाठी सुद्धा पायल आणि त्यानंतर पेट्रोल पंपावरील नोकरांनी मदत केली. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर त्या म्हातार्याला विचारले कुठले आपण त्यावर त्यांनी सांगितले.मी हिंगणघाट येथील आहे. चारगाव येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आलो होतो, परत गावाकडे जायचं आहे. त्यासाठी आलो होतो. सर्व व्यवस्थित झाल्यावर निघतो म्हणालो, तेव्हा बाबू चाय घेऊया मग जा. राहू द्या म्हणालो. मदत केल्याबद्दल त्यांनी आमचे धन्यवाद मानले. त्यानंतर पायल सोबत बोललो बाकी मुली नाही जवळ आल्या, पण तूच का पाणी आणून दिलं. " आपल्या घरच जर कोणी असतं, असा प्रसंग आला असता तर आपण पळून गेलो असता का मदत केली असती....मदतच केली असती न सर " तसच, म्हणत हसून उत्तर दिलं.😊 स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात हातात झेंडे घेऊन देशभक्तीचा आव आणणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या लोकांपेक्षा जिवंत माणसाला वाचवण्यासाठी दाखवलेली साहसी पायलची माणुसकी कितीतरी पटीने उत्तम आहे.👏👏👏👏 " साहसी - पायल घोडमारे " च्या माणुसकीला सलाम.... विलासभाऊ, पायलचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच..पण तुम्ही सुद्धा कौतुकास पात्र आहात..अडलेल्यांची मदत करणे व आपल्या कृतीतून इतरांनाही प्रोत्साहित करणे हे प्रेरणादायी आहे....तुम्हा दोघांचेही अभिनंदन💐💐💐💐💐💐 ✍️ विलास चौधरी (लेखक) (संयोजक - साहस उप्रकम ) |
Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- माना जमातीची संस्क्रृती थोडक्यात.
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- सुविचार संग्रह
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
- RTE (कलमाचे शिर्षक)