मुग्दाई बिग्रेड टीम - सावरला त. चिमूर जिल्हा. चंद्रपूर
👏
आज दिनांक 17 मे 2022 रोज मंगळवार ला रात्रौ.8-00 वाजता मुग्दाई ब्रिगेड टीम बनविण्यासाठी सभा घेण्यात आली.
समाजामध्ये तरुणीं / महिलांचे स्वतंत्र संघटन सुध्दा असावे.
त्यामध्ये
1. महिला आर्थिक व सामाजिक सुरक्षा.
2. महिला आरोग्य.
3. उच्च शिक्षणसाठी संधी उपलब्ध करून देणे.या उद्देशाने भविष्यात विविध प्रशिक्षणे / शिबीर / कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करून तरुणी / महिला साठी स्वतंत्र काम करता यावे यासाठी संघटनात्मक गरज लक्षात घेऊन सभा घेण्यात आली.सभेला मार्गदर्शक - विलास चौधरी, आदिवासी प्रकल्प कार्यालय चिमूर संघटक, प्रफुल - भरडे, कार्यकर्ते अंकित नन्नावरे व भूषण श्रीरामे व गावातील तरुणी, महिला उपस्थित होत्या. सोबत यावेळी आदिवासी विकास विभागा तर्फे राबविल्या जाणाऱ्या 30 दिवशीय निवासी पोलीस पूर्व प्रशिक्षणाची मुलींना माहिती देण्यात येऊन इतर आवश्यक विषयावर सुध्दा चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित राहून चांगले सहकार्य करणाऱ्या सर्व मुली / महिलांचे मनपूर्वक धन्यवाद.
मुग्दाई ब्रिगेड टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
No comments:
Post a Comment