एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे चंद्रपूरच्या शाळेत येणे बंद झाले.
त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून निशा दडमल या शिक्षिकेने वसा उचलला आहे. शाळा झाल्यावर 16 किलोमीटर दूर ताडोबाच्या घनदाट जंगलात असलेल्या मामला गावात त्या जातात. बाजूच्या दुधाळा या गावातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत जाण्यासाठी डॉक्टर अभिलाशा गावतुरे मॅम यांच्या सहकार्याने त्यानी ऑटो लावून दिला. हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख या कर्तुत्वाने आज दिनांक 4 मे 2022 ला C.S.T.P.S चे मुख्य अभियंता श्री माननीय पंकज सपाटे सर व ऊर्जानगर चे इतर अभियंता अधिकारीवर्ग यांनी या कार्याची दखल घेऊन सावित्रीची लेक भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या शिक्षिका निशा दडमल मोहुर्ले यांचा आज सत्कार करण्यात आला.
|