Home

Friday, May 20, 2022

मा.डॉ. रमेशकुमार गजभे शिक्षा संकुल पुयारदंड (भिसी)

• फलकाचे अनावरन •
मा.डॉ. रमेशकुमार गजभे शिक्षा संकुल पुयारदंड (भिसी)
मॅजिक, अंकुर, साहस, कानून हे आमच्या सहकारी कंपनीचे ब्रँड आहेत. हे ब्रँड शिक्षण, प्रशिक्षण आणि लोकनिर्माणाशी संबंधित असल्याने अगदी कमी कालावधीत प्रसिद्ध झालेत. या सर्व ब्रँडचे सर्वात मोठे भागीदार आहेत. आमचे दादा उर्फ सन्माननीय डॉ. रमेश कुमार गजबे (माजी राज्यमंत्री). 1995 मध्ये त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना केली होती. 2018 नंतर कोणताही वृद्ध आश्रमात रहात नसल्याने त्यांनी उभ्या केलेल्या करोडो रुपयाच्या काही वास्तू रिकाम्याच होत्या. याचा मॅजिक उपक्रमासाठी सुयोग्य वापर करता येईल का? या संदर्भात त्यांना आम्ही 2017 मध्ये विचारणा केली होती. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या नैसर्गिक पद्धतीने होकार देत "इथे जे चांगलं करता येईल ते करा" असे निरागस पणे सांगितले. आजही तेच बोलतात. आश्रमातील करोडो रुपयांच्या वास्तू आणि अनेक वस्तू त्यांनी या उपक्रमासाठी विनाशर्त मोफत उपलब्ध करून दिल्या. या अमूल्य सहकार्याविना आणि अभयदादांच्या पुढाकारावीणा मॅजिक-अंकुर-साहस-कानून ब्रँड निर्माण व्हायला फार उशीर आणि त्रासदायक झाले असते. किंवा निर्माणच झाले नसते कदाचित. आजच्या युगात वडील स्वतःच्या मुलाला संपत्तीतील वाटा द्यायला कचरतात. संपत्ती निर्मितीच्या आणि त्याला कवटाळण्याच्या या युगात आमचे दादा फारच वेगळे आहेत. हा परिसर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी किंचितही विचार केला नाही. आज शेकडो मुले याचा लाभ घेत आणि घेणार आहेत.
             मॅजिक उपक्रम सुरू होऊन अडीच वर्ष झालीत. बॅनरबाजी-फलकबाजी याची मुळातच गरज नसल्याने आमच्याकडून निसर्गतः त्याकडे दुर्लक्ष झाले. ब्राईटएज फाऊंडेशनचे बॅनर त्याच्या स्थापनेपासून तीन वर्षानंतर बनवले एवढी आमची समयसूचकता 😄. मॅजिकला भेट देण्यासाठी इच्छुक असणारे व्हिजिटर्स यांनी नेहमी तक्रार होती, की ईकडे यायला रस्ता गवसत नाही. मुख्य रस्त्यावर फलक लावा. अशा सूचना त्यांच्याकडून अनेकदा आल्या. असा फलक लावण्यासाठी आम्ही फक्त दोनच वर्षांनी घाई करतोय 😄. या फलकावर सुरुवातीला काय लिहावे ? असा विचार मनात घोळत होता. या परिसराला दादांचं नाव द्यावे असा विचार मनात आला. याला अनेक सहकाऱ्यांनी संमती दर्शवली. यासंदर्भात काल आम्ही दादांशी बोललो. "मी माझ्या नावासाठी काम करत नाही किंवा त्यासाठी मी हा परिसर उपलब्ध करून दिला नाही" असे म्हणत त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आमचे सहकारी संदीप भाऊ चौधरी यांना पण तसे मी कळवले. आपण जर त्यांचे नाव टाकले तर दादा नाराज होतील का? यासंदर्भात आम्ही विचारविमर्श केला आणि शेवटी हट्टाने ठरवले कि त्यांची नाराजी पत्करून आपण दादांचेच नाव द्यायचेच असे निश्चित केले. आमचे सहकारी नेताजी भाऊ यांच्या सहकार्याने फलक छपाई करून घेतला. आणि आज शंकरपूर-भिसी या मुख्य मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. "मा. डॉ. रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल पुयारदंड भिसी." आणि त्याच्या खाली सहकारी कंपनीचे ब्रँड. बघुयात आता किती शिवा खाव्या लागतील 😄.


No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट