Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- माना जमातीची संस्क्रृती थोडक्यात.
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- सुविचार संग्रह
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
- RTE (कलमाचे शिर्षक)
Thursday, September 15, 2022
चेवनिंग स्कॉलर ऍड. दीपक चटप यांची मॅजिकला भेट
🙏
दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून 45 लाख रुपयाची चेवनिंग स्कॉलरशिप मिळवलेले आणि आपल्या विविध रचनात्मक कामातून समाजात परिणामकारक बदल घडवणारे ऍड. दीपक चटप आणि तसेच पोम्भूर्णा तालुक्यातील घाटकुळ गावाला आदर्श गाव म्हणून नावलौकिक प्राप्त करून देणारे चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत युवा कवी, लेखक, मुक्त पत्रकार, आदर्श शाळा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक अविनाश पोईनकर यांनी, सोबतच पत्रकार व प्रगतशील शेतकरी हबीब शेख यांनी मॅजिकला भेट दिली.* त्याअगोदर कला वाणिज्य महाविद्यालय, भिसी येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये दीपक चटक यांनी विद्यार्थ्यांना प्रदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
सामाजिक जाणिवा जोपासत जीवनात यशस्वी होण्याण्यासाठी अनेक कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी माजी राज्यमंत्री आदरणीय डॉ. रमेश कुमार गजबे, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाने सर उपस्थित होते. मॅजिक भेटी दरम्यान त्यांनी मॅजिक विद्यार्थ्यांची संवाद साधला व विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. स्पर्धा परीक्षा सोबतच नामांकित संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले मॅजिक व इतर विविध उपक्रमाचे कौतुक करत कायदा व कायद्याचे शिक्षण यासंदर्भात मदत करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
मॅजिकला भेट दिल्याबद्दल आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल ऍड. दीपक चटप, अविनाश पोईनकर, हबीब शेख मॅजिक परिवाराच्यावतीने मनापासून आभार.
💐🌷🌷👏👏👏👏👏👏
Tuesday, September 13, 2022
जमाखर्च हिशोब.
।। जय मॉ मानिका ।। ।। जय बिरसा ।।
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र,
जिल्हा शाखा - वर्धा
कार्यालयीन पत्ता : श्री. भास्करराव चौके यांच्या घरी, गजानन नगर
वर्धा , ४४२००१ (महा.) मोबाइल नंबर : ९०७५९४९७९८.
Ref. : Date : १०-०९-२०२२
• जमाखर्च हिशोब. •
स्व. कुमार गोविंदा राजेश गडमडे यांच्या उपचारासाठी समाजबांधवानी केलेली आर्थिक मदत आणि त्या मदतीचा जमाखर्च हिशोब.
कुमार गोविंदा राजेश गडमडे मु. वडगाव ता. वरोरा जि. चंद्रपूर ०७ ऑगस्ट २०२२ पासुन ब्रेन ब्लॉक या आजारामुळे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथे भरती होता, त्यांच्या परिवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनसुद्धा त्यांनी १ लाख १० हजार रुपये इतका खर्च स्वबळावर गोविंदाच्या उपचारावर केलेला होता, शासकीय योजनेतील पैशेसुद्धा खर्च होऊन कमी पडले होते, त्यामुळे त्यांच्या परिवाराची हिम्मत खचून गेली होती. त्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी, त्यांची हिम्मत वाढवण्यासाठी समाजबांधवानी तसेच वडगाव गावकऱ्यांनी मदत केली तसेच गोविंदाची लवकरात लवकर तब्बेत बरी होण्यासाठी प्रार्थनासुद्धा केली होती. पण स्व. कुमार गोविंदा राजेश गडमडे यांच्या शरीराने साथ न दिल्यामुळे २२/०८/२०२२ ला सकाळी ठिक ०७:३० वाजता ब्रेन ब्लॉक या आजाराने दुखद निधन झाले. गोविंदाच्या आजार दुरुस्तीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल समाजबांधवांचे तसेच गावकऱ्यांचे आभार....
स्व. कुमार गोविंदा राजेश गडमडे यांच्या उपचारासाठी समाजबांधवानी केलेली आर्थिक मदत आणि त्या मदतीचा जमाखर्च हिशोब खालील प्रमाणे.
एकूण जमा रक्कम = 91,878 /- ( एक्यान्नव हजार, आठशे ,अठ्याहत्तर रुपये )
उपचाराला दिलेली रक्कम - 40,000 /- ( चाळीस हजार )
सद्याची शिल्लक रक्कम = 51,878 /- ( एक्कावन हजार आठशे अठ्याहत्तर )
सदर शिल्लक रक्कम 51,878 ₹ आरोग्य सेवा प्रमुख जिल्हा शाखा वर्धा यांच्याकडे जमा असून भविष्यात आरोग्याची समस्या जाणवल्यास खर्च करण्यात येईल.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून दीड लाख रुपयाचा लाभ मिळवून देण्यासाठी विद्यार्थी संघटना प्रयत्नशील आहे.
सर्व देणगीदार व समाज बांधवांनी नोंद घ्यावी......धन्यवाद.
आपला.
आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा
Monday, September 5, 2022
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...
Populer post / लोकप्रिय पोस्ट
-
पूजा फॉउंडेशन व ब्राईट ऍज फॉउंडेशन तर्फे, धर्मराजच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. भद्रावत...