Home

Tuesday, October 26, 2021

सहविचार सभा

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, गडचिरोली.
आज दिनांक 24/10/2021 ला संघटनेच्या वतीने सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती.
सभेला उपस्थित सदस्यांनी संघटनेच्या रचनात्मक व कार्यात्मक पुनर्बांधणीच्या उद्देशाने विविध धोरणात्मक विषयावर चर्चा केली.
समाजाच्या व संघटनेच्या सर्व स्तरात उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. संघटनेच्या पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी पुढील महिन्यात कार्यात्मक सभा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सभेला उपस्थित झालेल्या सर्व सदस्य व सल्लागार मंडळींचे खूप खूप धन्यवाद ......!!!

गौरव व शालेय साहित्य वाटप

पूजा फॉउंडेशन व ब्राईट ऍज फॉउंडेशन तर्फे,
धर्मराजच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
भद्रावती तालुक्यातील स्थानिक मुधोली येथून जवळच असलेल्या खुटवंडा या गावात कोरोनाच्या परस्थितीत तेथील विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या
प्रवाहात ठेवण्याची कामगिरी स्वयंप्रेरणेने तेथील युवा सामाजिक कार्यकर्ता धर्मराज विलास चौधरी गेल्या 1 वर्षांपासून करीत आहे.
अतिशय दुर्गम भाग असून सुद्धा कोरोनाच्या काळात तिथे शिक्षणात कोणताही खंड पडू न देता विध्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरळीत पणे चालु होते त्यांच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दाखल घेत पूजा फॉउंडेशन दादापुर व ब्राईट एज फॉउंडेशन भिवापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मराज चा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मो. नन्नावरे, उपाध्यक्ष अमोल बोधने. ब्राईट ऍज फॉउंडेशन चे कार्यकर्ते तथा आ.मा.ज.वि.युवा संघटनेचे विदर्भ संघटक विलासभाऊ चौधरी, नंदूभाऊ जांभुळे (विध्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर ) हरीशभाऊ काळमेघें (माजी तालुका अध्यक्ष भद्रावती ) तसेच जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टोंगे सर, सहाय्यक शिक्षक खवसे सर, यादव सिडाम (माजी सरपंच) रवींद्र मगरे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन ) अंबादास बावणे (तंटामुक्ती अध्यक्ष ) रामदास चौखे (वनव्यवस्थापन समिती सदस्य ) व शालेय विध्यार्थी तसेच गावकरी आदी उपस्थित होते.

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट