दिनांक 18 डिसेंबर 2021 रोज शनिवारला भिवापूर तालुक्यातील नांद या गावी नागदिवाळी चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून कारगाव क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल, विद्यार्थी युवा संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष सुभाष नन्नावरे, ब्राईटएज फाउंडेशनचे उपाध्यक्ष संदीप खडसंग यांना निमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे महिलाचा फार मोठा पुढाकार असतो. कोणत्याही सामूहिक समारंभ कार्यक्रमात पुरुष मंडळी दारू पिऊन झगडे भांडण करणे या गोष्टीत नावाजलेलं नांद हे गाव आज वेगळेच चर्चेत आहे. प्रसंग असा घडला वरील तीनही पाहुण्यांनी लोकांच्या मनाला भावेल अशी माहिती उपस्थित समाज बांधवांना दिली. आदरणीय शंकर दडमल यांनी समाजाला एकसंघ राहण्यासाठी आव्हान केले. सुभाषभाऊ नन्नावरे यांनी मॅजिक विषय इत्यंभूत माहिती दिली आणि संदीप खडसंग यांनी देलणवाडीची कहाणी सांगून भावूक केले. त्यानंतर हे सर्व मंडळी व्यासपीठावर उतरले आणि त्यांच्या समोर एक मुलगा हातात पैसे घेऊन त्यांच्या समोर आला. कृष्णा त्याचं नाव आणि तो सुभाष भाऊंना सांगू लागला सर मी नरडे विकता विकता तुमचं भाषण ऐकत होतो. तुम्ही मॅजिक विषय सांगत होतात. भविष्यात तिथून मोठे मोठे अधिकारी बननार आहे, असे तुम्ही सांगितले. मी दिवसभर नरडे विकून 300 रुपये कमावले आहे. त्यातून मॅजिकला 200 रुपये मदत म्हणून देत आहे. कृष्णाचा मोठेपणा पाहून कृष्णाचे गुरुजी सुभाष नन्नावरे आणि इतर मंडळी आवक झाली. कृष्णा आनंदराव घरत हा नांद येथील जिल्हा परिषद शाळेत 6 व्या वर्गात शिकणारा मुलगा आईवडिल शेतमजुरी करतात. त्यामुळे याला वारसाहक्काने आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमती अधिक मिळाली. अभ्यासात तसा जेमतेम असणारा कृष्णा सुट्टीच्या दिवशी छोटी कामे करून पैसे कमावतो आणि कुटुंबाला हातभार लावतो. खरंतर मॅजिक काम अशा होतकरू मुलांसाठीच आहे. परंतु छोट्या मजुरपुत्र कृष्णाने मॅजिकसाठी जी दानशूर वृत्ती दाखवली, ती दानशूर राजा सूर्यपुत्र कर्णाला लाजवेल अशी आहे, असे निसंकोचपणे म्हणावेसे वाटते. अशा या मुलाचे फक्त कौतुकच करणे कमीपणाचे वाटत असले तरी कृष्णाचे गुरुजी सुभाषभाऊ नन्नावरे यांनी आपल्या विद्यार्थ्याला शाबासकीची थाप द्यावी, यासाठी म्हणून स्पीकरद्वारे त्याच्या दानशूरपणाची स्तुती सर्व उपस्थितांसमोर केली. त्याचा परिणाम असा झाला की उपस्थितांपैकी इच्छुक 30 समाज बंधू-भगिनींनी आपल्या पदरचे पैसे मॅजिकला देणगी म्हणून दिले. आणि नागदिवाळीच्या माध्यमातून नांद वासियांनी एक वेगळा पायंडा रोवला. मदत करणान्यामध्ये, 1. सौ कुंदा किशोर घरत 2. सुरेखा विलास घरत 3. शंतनू प्रदीप घरत 4. सदाशिव बारेकर 5. वच्छला किसन ढोणे 6. नरेंद्र बालाजी बारेकर 7. पोर्णिमा सुरेश घरत 8. भूषण राजू बारेकर 9. संगीता बाबा घरत 10. रितिक किशोर घरत 11. कांचन विठोबा घरत 12. कमल संतोष सावसाकडे 13. विमल प्रभाकर सावसाकडे 14. वंदना देवराव घोडमारे 15. शिवानी राजकुमार रंदई 16. समीर सुनील धरत 17. युगांत किशोर घरत 18. प्राजक्ता लवकुश घरत 19. प्रणाली लवकुश घरत 20. ऋषभ जनार्दन वाघमारे 21. महेंद्र दोडके 22. रितू बबलू सोनवणे 23. प्रदीप नन्नावरे 24. मयुर गायकवाड 25. सचिन दादा घरत . 28. स्व. रामराव बावणे (मुलीकडून. 26. स्वाती अमोल रंधई. 27. संतोष माधव घरत. 29. शकुंतला गोपीचंद नारनवरे 30. वच्छला नानाजी दडमल यांचा समावेश आहे. या आदर्शवंत सहकार्यासाठी सर्व बंधू भगिनींचे मॅजिक परिवाराच्या वतीने खूप खूप आभार त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा. |
Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- माना जमातीची संस्क्रृती थोडक्यात.
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- सुविचार संग्रह
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
- RTE (कलमाचे शिर्षक)