Home

Wednesday, November 24, 2021

जमा खर्च अहवाल.

पुनम मुंढरे मदतनिधी जमा खर्च अहवाल.
    सर्व प्रथम आपल्या संवेदनशील देणगीदारबांधवांचे मनापासून आभार.
                आपण देणगीरूपातून दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे 4 लाख 9 हजार रुपये पुनमच्या उपचारासाठी जमा झाले होते. यामुळे तिला दवा आणि दुवा या दोन्ही •गोष्टींची कोणतीही कमतरता आपण ठेवली नाही. तरीपण तिच्या शरीराने साथ दिली नाही आणि तिचा दुर्देवी झालेला मृत्यू सर्वांना सर्वांच्या मनाला चटका लावून गेला..
                आपल्याकडून पाठवलेल्या मदतीमुळे शस्त्रक्रियेसोबतच औषधीचा आणि इतर खर्चसुद्धा भागवता आला आणि त्यामुळे अगोदरच दारिद्र रेषेखाली असलेले तिच्या वडिलांना पुन्हा अतिदारिद्र्यरेषेखाली जाण्यापासून आपण वाचवु शकलो. आपल्या कडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही सर्व भारावलो आहोत. आपल्याला आलेल्या अपयशाची खंत सुद्धा आहे.
                पुनमसाठी एकूण 409000 रुपये देणगीस्वरूपात मदत जमा झाली. या मदतीतून 362500 रुपये खर्च करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम 46500 रुपये एवढी आहे. तसेच पूनमचे भाऊजी संजय ढोक यांनी 17000 रुपये स्वखुशीने संघटनेला परत केले अशी एकूण रक्कम 63500 रुपये संघटनेचे कोषाध्यक्ष यांच्याकडे जमा राहील,

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट