Home

Monday, August 29, 2022

"पैदागिर" टिमची मॅजिकला सदिच्छा भेट

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कृत चित्रपट "पैदागिर" टीमची मॅजिकला सदिच्छा भेट.

         आज दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी "पैदागिर" टीमने मॅजिकला सदिच्छा भेट दिली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक व प्रसिद्ध कलाकार संजय जिवने सर, चित्रपटाच्या निर्मात्या वंदना जीवने, तेलंग मॅडम व इतर सहनिर्माते, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सांची जीवने, बालकलाकार जय भगत, गवई सर व इतर कलाकार आणि मार्गदर्शक रविकांत गौतमी, सर बागडे सर व बागडे मॅडम उपस्थित होते.
"पैदागीर" या चित्रपटांमध्ये आई व तिच्या बाळाची शिक्षण घेत असतानाची संघर्षाची कथा अतिशय वास्तविकपणे मांडण्यात आलेली आहे. या चित्रपटाला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. सोबतच जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा "कान्स चित्रपट महोत्सवामध्ये" या चित्रपटाला गौरवण्यात आलेले आहे. तसेच या चित्रपटाला "सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपट" म्हणून गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सांची जीवने हिला "दादासाहेब फाळके सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा" पुरस्कार मिळालेला आहे.
         या चित्रपटातील सर्व कलाकार स्थानिक नागपूर व विदर्भाचे असून सामान्य कुटुंबातील आहे. या चित्रपटातील बालकलाकार जय भगत हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याची आई कपड्याच्या दुकानात काम करते. तर जय हा प्राथमिक घेत आहे. तो अतिशय हुशार असून यावर्षी तो शाळेतून प्रथम क्रमांकाने पास झालेला आहे. स्वतः त्याचा व त्याच्या आईचा शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे.
या चित्रपटाला मोठ्या संघर्षाने चार चित्रपटगृह मिळालेले असून हा चित्रपट नागपूर व चंद्रपूरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अधिकाधिक चित्रपट गृह मिळावे यासाठी जीवने सर प्रयत्न करत आहेत. तरी या चित्रपटाचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन मॅजिक परिवार व विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
पैदागिर टीमने मॅजिक उपक्रमाचे अतिशय भरभरून कौतुक केले व या उपक्रमाच्या चित्रफिती बनवण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले.
मॅजिकला भेट दिल्याबद्दल पैदागिरी टीमचे मॅजिक परिवाराच्या वतीने खूप खूप आभार.
👏👏👏👏🙏🙏🙏

Monday, August 22, 2022

दुखद वार्ता

दुखद वार्ता :
-----------------------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम आपल्या संवेदनशील देणगीदार बांधवाचे मनापासुन आभार.
-----------------------------------------------------------------------------------------
आपणास कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, आज सकाळी ठिक ०७:३० वाजता कु. गोविंदा राजेश गडमडे ( मु.वडगाव ) यांचे ब्रेन ब्लॉक या आजाराने दुखद निधन झाले आहे. आपण आर्थिक मदतीच्या रुपात दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे गोविंदाच्या उपचारासाठी एका दिवसात अंदाजे ८४००० ₹ रुपये एवढी रक्कम जमा झालेली होती, त्यामुळे त्याला दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टिंची कमतरता आपण ठेवणार नव्हतो, पण कु. गोविंदा यांच्या शरिराने साथ दिली नाही आणि दि. २२/०८/२०२२ वार सोमवारला ठिक ०७:३० वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, इथे गोविंदा राजेश गडमडे या १४ वर्षाच्या मुलाने अखेर श्वास सोडला. या दुर्दैवाने झालेल्या गोविंदाच्या मृत्युने सर्वांना , सर्वाच्या मनाला तो खंत लावुन गेला.😞आपणाकडुन आर्थिक मदतीचा मिळालेल्या प्रतीसादामुळे आम्ही सर्व आपले ऋणी आहोत पण आपल्याला आलेल्या अपयशाची खंत सुध्दा आहे.😞😞 प्रकृती त्याच्या आत्म्यास शांती देवो त्यांचा कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
आ. मा. ज. विद्यार्थी युवा संघटना महा, जिल्हा शाखा वर्धा व आपणा सर्वां कडून ....
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐🌷🌷🙏🙏
-----------------------------------------------------------------------------------------

Monday, August 15, 2022

दैनिक नवजीवनने घेतली तेजस्विनीच्या कार्याची दखल

भोवळ येऊन पडलेल्या वृध्दाच्या मदतीला सरसावली तेजस्विनी
दैनिक नवजीवनने घेतली तेजस्विनीच्या कार्याची दखल
• साहसी पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे •

Saturday, August 13, 2022

"साहसी - पायल घोडमारे " च्या माणुसकीला सलाम....

• साहसी पायल •
" साहसी - पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे " च्या माणुसकीला सलाम.👏
         आज दिनांक १३/०८/२०२२, वार - शनिवार ला दुपारी ०३:०० च्या सुमारातील प्रसंग बस स्टॉप जवळ शेगांव (बु.) त.- वरोरा जिल्हा - चंद्रपूर येथील
भारत पेट्रोलियम पंप जवळ पेट्रोल पंपावरून बाहेर निघत होतो. पेट्रोल पंपाच्या बाहेर निघण्याच्या मार्गावरील कडेला बसलेला एक म्हातारा धडकन चक्कर येऊन खाली पडला. बसलेला म्हातारा अचानक पडला म्हणून आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरड केली पण जवळ मात्र कोणी जात नव्हतं. माझ्या सोबत असलेल्या कुटुंबाला बाजूला ठेवून मीच म्हाताऱ्याच्या जवळ जाण्याची हिंमत केली. पडलेल्या म्हाताऱ्याला उठवून बसविला आणि दोन्ही हाताने कान दाबले कुणीतरी पाणी आणा असा आवाज दिला. अस्वस्त म्हाताऱ्याने पटापट उलटी करणे सुरू केली. त्या ठिकाणी शाळकरी सात-आठ मुली होत्या इतर अनेक प्रवासी, दुकानदार होते. त्यातील मुलींनी सी-बाप्पा, सी-बाप्पा म्हणत पळ काढला. इतर लोकांनी दुर्लक्ष केले. मात्र त्याच ठिकाणी असलेली साहस - 2022 प्रशिक्षणाची विद्यार्थिनी कु. पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे मु. वडधा ता.- वरोरा हिने साहस दाखवत धावत जावून त्या व्यक्तीसाठी पाणी आणून दिले. पाणी पाजल्यानंतर तो म्हातारा शुद्धीवर आला. मात्र त्याच्या सोबतच काय झाले हे त्यालाच माहीत नव्हते. त्यानंतर सर्व हकीकत सांगितली त्याचे सर्व कपडे भरलेले होते. ते धुण्यासाठी सुद्धा पायल आणि त्यानंतर पेट्रोल पंपावरील नोकरांनी मदत केली. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर त्या म्हातार्‍याला विचारले कुठले आपण त्यावर त्यांनी सांगितले.मी हिंगणघाट येथील आहे. चारगाव येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आलो होतो, परत गावाकडे जायचं आहे. त्यासाठी आलो होतो. सर्व व्यवस्थित झाल्यावर निघतो म्हणालो, तेव्हा बाबू चाय घेऊया मग जा. राहू द्या म्हणालो. मदत केल्याबद्दल त्यांनी आमचे धन्यवाद मानले. त्यानंतर पायल सोबत बोललो बाकी मुली नाही जवळ आल्या, पण तूच का पाणी आणून दिलं. " आपल्या घरच जर कोणी असतं, असा प्रसंग आला असता तर आपण पळून गेलो असता का मदत केली असती....मदतच केली असती न सर " तसच, म्हणत हसून उत्तर दिलं.😊
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात हातात झेंडे घेऊन देशभक्तीचा आव आणणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या लोकांपेक्षा जिवंत माणसाला वाचवण्यासाठी दाखवलेली साहसी पायलची माणुसकी कितीतरी पटीने उत्तम आहे.👏👏👏👏
" साहसी - पायल घोडमारे " च्या माणुसकीला सलाम....
विलासभाऊ, पायलचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच..पण तुम्ही सुद्धा कौतुकास पात्र आहात..अडलेल्यांची मदत करणे व आपल्या कृतीतून इतरांनाही प्रोत्साहित करणे हे प्रेरणादायी आहे....तुम्हा दोघांचेही अभिनंदन💐💐💐💐💐💐
                       ✍️ विलास चौधरी (लेखक)
                            (संयोजक - साहस उप्रकम )

Monday, August 1, 2022

गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा - २०२२

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा वर्धा
आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा - २०२२
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा - २०२२
  •                 हिंगणघाट येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा तसेच आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने " शिवशक्ती सभागृह " हिंगणघाट येथे,
    दिनांक ३१/०७/२०२२ वार रविवारला वर्धा जिल्ह्यातील दहावी , बारावी, नवोदय, तसेच स्पर्धा परिक्षा व ईतर परिक्षेमधे गुणवत्ता / यश प्राप्त करणार्‍या माना जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात व्यवसायिक मार्गदर्शन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.आनंदरावजी जांभुळे सर ( सचिव - आ.माना जमात मंडळ वर्धा जिल्हा ), यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा.श्री. बाबारावजी झापे सर उपस्थित होते.
    कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून,
    मा.श्री.योगेश वानखेडे सर ( Success Academy Wardha ),
    मा.श्री. निलेश नारनवरे सर ( Nature Foundation Nagpur ),
    मा.श्री.श्रीकांत भाऊ ऐकुडे ( अध्यक्ष-Bright Age Foundation ) हे उपस्थित होते.
    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून,
    मा.श्री.रविंद्रजी काळमेंगे सर (आ.मा.ज.वि.यु.संघटना महाराष्ट्र सल्लागार ),
    मा.श्री.रोशनभाऊ चौखे ( माजी जि.प.सदस्य ),
    मा.सौ.जयश्रीताई प्रमोद चौखे ( माजी जि.प. सदस्या ),
    मा.श्री.अरविंदजी बगडे ( शिक्षक हिंगणघाट ),
    मा.श्री.अनिलजी चौधरी ( आ.माना जमात मंडळ हिंगणघाट ),
    मा.श्री.भाष्करजी गुळधे ( सहसचिव - आ.मा.जमात मंडळ हिंगणघाट )
    हे उपस्थित होते.
    या कार्यक्रमात मान्यावरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.व शेवटी अध्यक्षीय भाषण झाले
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.अनिल चौधरी सर यांनी केले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन - सौ.मिनाक्षी नरेंद्र नारनवरे मॅडम व कु.मंगेश चौधरी यांनी केले.
    आभारप्रदर्शन - कु.आकाश बारेकर यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.
    कार्यक्रम आयोजनासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा व आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थी पालक उपस्थित होते,
    त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट