Home

Wednesday, May 25, 2022

सिताई रोपवाटिका

• सिताई रोपवाटिका •
१५ जुन पासून रोपे उपलब्ध होतील, Advance बुकिंग केल्यास १० % सुट.

Sunday, May 22, 2022

युवा चेतना - २०२२

• युवा चेतना - २०२२ •
कार्यकर्ता चिंतन शिबीर, सालोरी

Saturday, May 21, 2022

• महत्वाची सुचना / Important Intimation •

•महत्वाची सूचना •
कार्यशाळा पुढे घेण्याबाबत
कानून
(महाराष्ट्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी अधिनियम-2003)

(महाराष्ट्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी अधिनियम-2003) कार्यशाळा दिनांक 22 मे ते 23 मे 2022 ला कानुन प्रशिक्षण करीता, नोंदणी केलेल्या समाजबांधवासाठी आयोजित केली होती. परंतु काही कारणास्तव / अडचणीमुळे सदर कार्यशाळा 22 व 23 न घेता पुढे घेण्यात येणार आहे. तरी सर्व रजिस्ट्रेशन केलेल्या समाज बांधवांनी नोंद घ्यावी......

संदर्भाने काही प्रश्न असल्यास
                         संपर्क : 8208580059

Friday, May 20, 2022

सिताई रोपवाटिका, सुसा

• सिताई रोपवाटिका, सुसा •
सुसा, ता.- वरोरा, जिल्हा - चंद्रपूर.

मा.डॉ. रमेशकुमार गजभे शिक्षा संकुल पुयारदंड (भिसी)

• फलकाचे अनावरन •
मा.डॉ. रमेशकुमार गजभे शिक्षा संकुल पुयारदंड (भिसी)
मॅजिक, अंकुर, साहस, कानून हे आमच्या सहकारी कंपनीचे ब्रँड आहेत. हे ब्रँड शिक्षण, प्रशिक्षण आणि लोकनिर्माणाशी संबंधित असल्याने अगदी कमी कालावधीत प्रसिद्ध झालेत. या सर्व ब्रँडचे सर्वात मोठे भागीदार आहेत. आमचे दादा उर्फ सन्माननीय डॉ. रमेश कुमार गजबे (माजी राज्यमंत्री). 1995 मध्ये त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना केली होती. 2018 नंतर कोणताही वृद्ध आश्रमात रहात नसल्याने त्यांनी उभ्या केलेल्या करोडो रुपयाच्या काही वास्तू रिकाम्याच होत्या. याचा मॅजिक उपक्रमासाठी सुयोग्य वापर करता येईल का? या संदर्भात त्यांना आम्ही 2017 मध्ये विचारणा केली होती. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या नैसर्गिक पद्धतीने होकार देत "इथे जे चांगलं करता येईल ते करा" असे निरागस पणे सांगितले. आजही तेच बोलतात. आश्रमातील करोडो रुपयांच्या वास्तू आणि अनेक वस्तू त्यांनी या उपक्रमासाठी विनाशर्त मोफत उपलब्ध करून दिल्या. या अमूल्य सहकार्याविना आणि अभयदादांच्या पुढाकारावीणा मॅजिक-अंकुर-साहस-कानून ब्रँड निर्माण व्हायला फार उशीर आणि त्रासदायक झाले असते. किंवा निर्माणच झाले नसते कदाचित. आजच्या युगात वडील स्वतःच्या मुलाला संपत्तीतील वाटा द्यायला कचरतात. संपत्ती निर्मितीच्या आणि त्याला कवटाळण्याच्या या युगात आमचे दादा फारच वेगळे आहेत. हा परिसर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी किंचितही विचार केला नाही. आज शेकडो मुले याचा लाभ घेत आणि घेणार आहेत.
             मॅजिक उपक्रम सुरू होऊन अडीच वर्ष झालीत. बॅनरबाजी-फलकबाजी याची मुळातच गरज नसल्याने आमच्याकडून निसर्गतः त्याकडे दुर्लक्ष झाले. ब्राईटएज फाऊंडेशनचे बॅनर त्याच्या स्थापनेपासून तीन वर्षानंतर बनवले एवढी आमची समयसूचकता 😄. मॅजिकला भेट देण्यासाठी इच्छुक असणारे व्हिजिटर्स यांनी नेहमी तक्रार होती, की ईकडे यायला रस्ता गवसत नाही. मुख्य रस्त्यावर फलक लावा. अशा सूचना त्यांच्याकडून अनेकदा आल्या. असा फलक लावण्यासाठी आम्ही फक्त दोनच वर्षांनी घाई करतोय 😄. या फलकावर सुरुवातीला काय लिहावे ? असा विचार मनात घोळत होता. या परिसराला दादांचं नाव द्यावे असा विचार मनात आला. याला अनेक सहकाऱ्यांनी संमती दर्शवली. यासंदर्भात काल आम्ही दादांशी बोललो. "मी माझ्या नावासाठी काम करत नाही किंवा त्यासाठी मी हा परिसर उपलब्ध करून दिला नाही" असे म्हणत त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आमचे सहकारी संदीप भाऊ चौधरी यांना पण तसे मी कळवले. आपण जर त्यांचे नाव टाकले तर दादा नाराज होतील का? यासंदर्भात आम्ही विचारविमर्श केला आणि शेवटी हट्टाने ठरवले कि त्यांची नाराजी पत्करून आपण दादांचेच नाव द्यायचेच असे निश्चित केले. आमचे सहकारी नेताजी भाऊ यांच्या सहकार्याने फलक छपाई करून घेतला. आणि आज शंकरपूर-भिसी या मुख्य मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. "मा. डॉ. रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल पुयारदंड भिसी." आणि त्याच्या खाली सहकारी कंपनीचे ब्रँड. बघुयात आता किती शिवा खाव्या लागतील 😄.


Wednesday, May 18, 2022

मुग्दाई बिग्रेड टीम


मुग्दाई बिग्रेड टीम - सावरला त. चिमूर जिल्हा. चंद्रपूर 👏

आज दिनांक 17 मे 2022 रोज मंगळवार ला रात्रौ.8-00 वाजता मुग्दाई ब्रिगेड टीम बनविण्यासाठी सभा घेण्यात आली.

समाजामध्ये तरुणीं / महिलांचे स्वतंत्र संघटन सुध्दा असावे.
त्यामध्ये

  • 1. महिला आर्थिक व सामाजिक सुरक्षा.
  • 2. महिला आरोग्य.
  • 3. उच्च शिक्षणसाठी संधी उपलब्ध करून देणे.
  • या उद्देशाने भविष्यात विविध प्रशिक्षणे / शिबीर / कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करून तरुणी / महिला साठी स्वतंत्र काम करता यावे यासाठी संघटनात्मक गरज लक्षात घेऊन सभा घेण्यात आली.
  • सभेला मार्गदर्शक - विलास चौधरी, आदिवासी प्रकल्प कार्यालय चिमूर संघटक, प्रफुल - भरडे, कार्यकर्ते अंकित नन्नावरे व भूषण श्रीरामे व गावातील तरुणी, महिला उपस्थित होत्या. सोबत यावेळी आदिवासी विकास विभागा तर्फे राबविल्या जाणाऱ्या 30 दिवशीय निवासी पोलीस पूर्व प्रशिक्षणाची मुलींना माहिती देण्यात येऊन इतर आवश्यक विषयावर सुध्दा चर्चा करण्यात आली.
    यावेळी उपस्थित राहून चांगले सहकार्य करणाऱ्या सर्व मुली / महिलांचे मनपूर्वक धन्यवाद.

  • मुग्दाई ब्रिगेड टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

    Tuesday, May 17, 2022

    अंकुरसाठी निवासी वेळ देणारे कार्यकर्ते


    * अंकुर - 2022 - प्रशिक्षण * शिबिर *
    * अंकुरसाठी निवासी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी *

              दिनांक           -     कार्यकर्त्यांचे नाव   


       01) 16 मे ते 18 मे    भूषण श्रीरामे, गिरड

       02) 16 मे ते 21 मे    प्रदीप चौधरी,पोहा

       03) 16 मे ते 24 मे    सुधाकर चौखे (अंकुर गुरू)

       04) 17 मे ते 18 मे    राजू केदार (अंकुर गुरू)

       05) 17 मे ते 21 मे    संदीप धारने, मासळ

       06) 17 मे ते 15 जून    प्रमोद ठोंबरे (अंकुर गुरू)

       07) 19 मे ते 20 मे    अमोल चौधरी, पुजई

       08) 19 मे ते 20 मे    उमेश दोहतरे

       09) 20 मे ते 22 मे    निखिल राणे, सुसा

       10) 21 मे ते 22 मे    अतुल श्रीरामे

       11) 21 मे ते 24 मे    प्रफुल ढोके, आलेसुर

       12) 21 मे ते 24 मे    कैलास ढोणे, आलेसुर

       13) 23 मे ते 30 मे    भाऊराव घरत

       14) 24 मे ते 31 मे    राजू श्रीरामे, खेमजई

       15) 26 मे ते 27 मे    जगन्नाथ नन्नावरे, चंदनखेडा

       16) 27 मे ते 30 मे    मे सचिन सोनवणे

       17) 28 मे ते 29 मे    रणजित सावसाकडे, शंकरपुर

       18) 28 मे ते 29 मे    नंदू जांभुळे, चरुर

       19) 29 मे ते 30 मे    रामचंद्र दोडके

       20) * प्रत्येक रविवार व सोमवार रोशन जांभुळे, शंकरपूर*

    👉 * अंकुर * ला फुलवण्यासाठी अमूल्य वेळ या सामाजिक कार्यात देण्याऱ्या सर्व समाजबांधव व कार्यकर्त्यांचे
        मनपूर्वक आभार *
    👏👏👏

    उपक्रम व त्याचा उद्देश

    उपक्रम व त्याचा उद्देश समजून घेतला. त्याबद्दल दिवाकर भाऊचे मनापासून आभार👏

    ✍️ दिवाकर मानगुळधे, चंद्रपूर

    👍👍👍
    • ब्राईटेज फाऊंडेशन (मॅजिक) चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
      पहिल्यांदाच जे जे उपक्रम राबवित आहे ते वास्तविकतेला धरुन आहे. अशा हितकारक उपक्रमामुळे उत्साह आणि मनोबल वाढायला स्वाभाविक आयुष्याच्या जडणघडणीत मोलाची ठरेल यात शंका नाही. ब्राईटेज हि समाज सेवाभावी संस्था त्यांच्या नावारुप काम करीत आहे. हे खास उल्लेखनीय आहे. असे काम फक्त हित साधणारी मानसेच करु शकतात. नाहीतर आज स्वार्थाने जिकडे तिकडे सर्वच पोखरलेले असतानाही. आपणही काही समाजाचे देणे आहे या शुध्द भावनेने जे आज ब्राईटेज काम करीत आहे. ते कौतुकास्पद आहे. या एक दोन महिण्यापासुन अंमलात आणलेल्या संकल्पना म्हणजे कानुन, साहस, अंकुर यामध्ये आपण आज काय करु शकतो यापेक्षा भविष्यात घडणाऱ्या प्रसंगात कसे टिकाव धरू शकतो हे प्रामुख्याने सांगण्याचा किवा शिकवण्याचा जो एक अर्थ या संकल्पनेत दडलेला आहे, असे मला वाटते. कानुन म्हणजे कायदा हा सर्वाच्या शिक्षणाचा विषय नसला तरी तो समाजाच्या जाग्रृतेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करुन या कायद्याचे महत्व किती मोठे आहे हे बिगरलाॅच्याही समाज बांधवांना पटवुन दिले आणि त्याचे मनोबल वाढविले. हेही अशक्य काम शक्य करुन दाखविले. यांने नक्कीच त्या व्यक्तीमध्ये वा समाजबांधवामध्ये एखाद्या कार्यालयात किवा सार्वजनिक जिवणात पुढच्या व्यक्तीला कामास विलंब का ? अडले कोठे ? मनण्याचे धाडस निर्मान होईल व बिना झीझक त्या अधिकार्याला काम करण्यास बाध्य करेल यात शंका नाही. साहस सारख्या उपक्रमाची महिलाना / पुरुषाना नितांत आवश्यकता आहे. या उपक्रमाचे सुध्दा आपण आयोजन केलेत आणि हा सुध्दा उपक्रम तुम्ही मोठ्या कष्टाने परिश्रमाने यशस्वी करुन दाखवला. या मधुन तुम्ही दाखवुन दिले की अत्याचाराला बळी पडण्यापेक्षा आत्म सुरक्षा कशी करायची प्रसंगावधान कसे राहायचे. शक्ती पेक्षा युक्ती बरी मनतात ना. या मधुन तंतोतंत खरे दिसते. महिलांनी अबला बनुन कोणीतरी वाचवेल या भ्रामक कल्पनेत न राहता आपण किती सक्षम आहोत. या साहसच्या माध्यमातुन दाखवुन दिले. प्रसंगावधान राखणे आणि संकटाचा सामना करणे, ईतके मनोबल उंचावण्यास तरी या साहसचा नक्कीच आमच्या माय बहिणाना याचा उपयोग होईल. अंकुर संकल्पनाच नाही तर समाज जडणघडणीचा एक पिलर आहे. या पिलरला मजबुत करण्याचे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच नाही तर ती एक जबाबदारी आहे. आजचे हे अंकुर ऊद्याला व्रृक्ष कसे बनेल ? यांचे भान प्रत्येक पालकांनीच नाही तर समाजबांधवानी घ्यायला हवे. व्रृक्ष सरळ वाढणारा हवा की फांद्या करणारा हे या अंकुरावरुन ठरत असले तरी त्या फांद्या वाढवण्याचे काम सर्वाचेच आहे असे मला वाटते. (सरळ म्हणजे स्वार्थ बाळगणारा सावली नसलेला,फांद्या असणारा म्हणजे सावली देणारा उपयोगी पडणारा या अर्थि) आज या अंकुरा ला एक मार्ग मिळेल, मला कसे वाढायचे ? आणि या मार्गदर्शनातुनच एक अनोखी जिद्द घेऊनच आपला मार्ग शोधण्याचे बाळकडू म्हणजेच अंकुर ठरेल यात शंका नाही. असेच या ब्राईटेज सेवाभावी संस्थेचे अंकुरातुन वटव्रृक्ष होवो, अशी या उपक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लिहिण्यात कोणत्या चुका झाल्या असेल तर क्षमा मागतो.

    ✍️_ दिवाकर मानगुळधे, चंद्रपूर _✍️

    अंकुर - २०२२

    " अंकुर " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १४ मे ते १४ जुन, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.
    " अंकुर " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १४ मे ते १४ जुन, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.

    Thursday, May 12, 2022

    प्रशिक्षणातील काही क्षण

    " साहस " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १० मे ते १४ मे, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.
    * साहस प्रशिक्षणातील लाटी शिकविताना प्रशिक्षक *
    " साहस " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १० मे ते १४ मे, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.

    Wednesday, May 11, 2022

    * प्रशिक्षणाचा दुसरा दिवस *

    * साहस -2022 *
    * तूच कर तुझे रक्षण * .......................................................................................................................
    प्रशिक्षणाच्या दुसर्‍या दिवशी,
    मा.दीपा चावरे मॅडम (उद्योजक बुट्टीबोरी) व मा.डॉ.कांचन जांभुळे (आरोग्य अधिकारी, PHC शंकरपूर) या मान्यवरांचे विविध महिला उद्योग व महिला आरोग्य संदर्भात मार्गदर्शन झाले.
    सोबत शिबिरात सहभागी तरुणींनी ची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सोबत मॅजिक उपक्रमाची पाहुण्यांनी पाहणी केली.
    * धन्यवाद *👏👏👏👏

    Tuesday, May 10, 2022

    " साहस " या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा

    * साहस -2022 * * तूच कर तुझे रक्षण *
    आज दिनांक 10 मे 2022 रोज मंगळवारला "साहस" या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. *या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, उद्घाटक- आंबोली गावच्या सरपंच शालिनीताई दोहतरे, प्रमुख पाहुणे- सम्यक विद्यार्थी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभमभाऊ मंडपे व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राहुलभाऊ दडमल उपस्थित होते.* या शिबिराला आतापर्यंत 70 मुलींनी उपस्थिती दर्शवली आहे. *साहस प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी योगदान ,सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक धन्यवाद*👏👏👏👏👏👏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

    Thursday, May 5, 2022

    हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख

    हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख..........
    एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे चंद्रपूरच्या शाळेत येणे बंद झाले. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून निशा दडमल या शिक्षिकेने वसा उचलला आहे. शाळा झाल्यावर 16 किलोमीटर दूर ताडोबाच्या घनदाट जंगलात असलेल्या मामला गावात त्या जातात. बाजूच्या दुधाळा या गावातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत जाण्यासाठी डॉक्टर अभिलाशा गावतुरे मॅम यांच्या सहकार्याने त्यानी ऑटो लावून दिला. हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख या कर्तुत्वाने आज दिनांक 4 मे 2022 ला C.S.T.P.S चे मुख्य अभियंता श्री माननीय पंकज सपाटे सर व ऊर्जानगर चे इतर अभियंता अधिकारीवर्ग यांनी या कार्याची दखल घेऊन सावित्रीची लेक भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या शिक्षिका निशा दडमल मोहुर्ले यांचा आज सत्कार करण्यात आला. 🙏🙏🙏( संदर्भ : Whatsapp ) 🙏🙏🙏

    Wednesday, May 4, 2022

    स्व. विजेंद्र नन्नावरे सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मॅजिकमध्ये वृक्षारोपण

    दिनांक ०४/०५/२०२२ रोज बुधवारला, स्व. विजेंद्र नन्नावरे सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मॅजिकमध्ये वृक्षारोपण
    अष्टपैलू व्यक्तिमत्व, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भचे कार्यकर्ते तथा मॅजिक उपक्रमाचे सहकारी स्वर्गीय विजेंद्रभाऊ नन्नावरे यांचा आज प्रथम स्मृतिदिन. मॅजिकच्या प्रथम तुकडी प्रवेशाच्या प्रक्रियेत त्यांचा उस्फुर्त सहभाग होता. त्यांनी मॅजिकसाठी तब्बल 60 पुस्तके उपलब्ध करून दिली.

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    दिनांक ०४/०५/२०२२ रोज बुधवारला
    स्व. विजेंद्र नन्नावरे सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्यांची स्मृती कायमस्वरूपी जपता यावी यासाठी मॅजिकमध्ये वृक्षारोपण व मौन धारण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
    आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना आणि मॅजिक परिवाराच्या वतीने विजेंद्रभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

    देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

    Populer post / लोकप्रिय पोस्ट