Home

Saturday, November 26, 2022

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी...........
सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..!
जान्हवी विष्णु नारनवरे मु.पो.चिचघाट ता.जि.यवतमाळ ही 10 वर्षाची मुलगी. शेतात आई सोबत गेली असता तीला सर्पदंश झाला. तिला उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल यवतमाळ मध्ये भरती केले असता प्राथमिक उपचार तिथे करण्यात आले. परंतु तिच्या शरीरातले रक्त गोठल्यामुळे तिला वेगळ्या दवाखान्यात नेवून डायलीसीस करावी लागत होते. शेतमजूर कुटुंब ,परिस्थिती हलाखीची त्यामुळे उपचाराकरीता त्यांच्याकडे पैसे जुडवा जुळवून न झाल्यामुळे त्यांनी त्या मुलीला घरी परत आणले होते. सदर प्रकरणाची माहिती जिल्हाशाखा - यवतमाळ ला मिळाली नंतर समाज बांधवांनी दिलेल्या (गोविंदा) वडगाव प्रकरणातील 15,000/- रुपयाची तात्काळ मदत व विद्यार्थी युवा संघटना जिल्हाशाखा - यवतमाळ यांचे कडून 5000/- रुपयांची मदत देवून तिला सावंगी मेघे हॉस्पिटल, वर्धा उपचार सुरू करण्यात येवून यवतमाळ येथील समाज बांधवांना जान्हवीचे उपचारासाठी यत्ताशक्ती मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ येथील व इतर देणगीदारांकडून 22,556 /- रुपयांची अमूल्य मदत मिळाली. जान्हविच्या उपरादरम्यान संपूर्ण खर्च - 23,000/- रुपये झालेला आहे. आपणा सर्वांच्या माहितीसाठी सादर.🙏
आपल्या सर्वांच्या मदतीरुपी आशीर्वादाने व डॉ.उपचाराच्या प्रयत्नाने एका चिमुकलीला जीवनदान देण्यात आपण यशस्वी झालो. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य करणारे नितेश गायकवाड, सुभाष नारनवरे, हेमेंद्र राऊत, निखिल घरत, निलेश भाऊ लडके, रविंद्रजी मंगरे (यवतमाळ), मंगेश चौधरी, अमोल चौधरी - (वर्धा) सोबत सर्व कार्यकर्त्यांचे व सर्व देणगीदार यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
🙏🙏 आ.मा.ज.विद्यार्थी युवा संघटना, महा. जिल्हा शाखा यवतमाळ.
जान्हवी चे उपचारासाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांची यादी खालील प्रमाणे.
............🤝🤝..........
01) श्री. पुरुषोत्तम बारेकर चिचघाट 500 रू.
02) श्री. प्रकाश पांडुरंग बारेकर नांदेपरा 500 रू.
03) श्री. सुनिल शेंडे मू. कळंब 500 रू
04) जोहार नामदेव घोडमारे भंडारा 200 रू.
05) श्री. गजुभाऊ सावसाकडे यवतमाळ 500 रू.
06) आ.मा.ज.विद्यार्थी युवा संघटना, महा. जिल्हा शाखा - यवतमाळ 5000 रू.
07) श्री. यशवंत दामोधर बारेकर चिचघाट 500 रू.
08) श्री. आकाश गायकवाड मुंबई 500 रू.
09) श्री. दिपक नारनवरे 500 रू.
10) श्री. विक्की बगडे कोळंबी 501 रू
11) सौ. अपराजिता अशोकराव राउत 200 रू.
12) श्री. महेंद्र रामचंद्र निमसटकर 1000 रू.
13) सौ. अर्चना नाथराव रूद्रे 500 रू.
14) योगिता मारतवार 100 रू.
15) श्री. प्रा. सुहानंद ढोक यवतमाळ 1001 रू.
16) श्री. राहुल मारोतराव पडाळ यवतमाळ 200 रू.
17) श्री. सचिन संदलवार पांढरकवडा 200 रू.
18) श्री. राहुल केशवराव आलसेटवार 1000 रू.
19) श्री. विठ्ठल राऊत काकाजी यवतमाळ 501 रू.
20) श्री. भुषण मारोती दांडेकर वर्धा 500 रू.
21) श्री. दर्शन अशोकराव बगडे 250 रू.
22) श्री. महेश आत्माराम वाकडे 200 रू.
23) श्री. नंदकिशोर चौधरी बाभुळगाव 500 रू.
24) श्री. अशोक त्रिंबकराव धारतारकर बुलढाणा 400 रू.
25) मृणाल गुरुदास तुराणकर खेमजई 200 रू.
26) श्री. चेतनजी चौधरी गेवरा 500 रू.
27) श्री. दिनेश वैद्य येराबारा यवतमाळ 500 रू.
28) श्री. रविंद्र सदाशिव मेश्राम 200 रू.
29) भाग्यश्री 200 रू.
30) श्री. चेतन भाऊराव चौके भानखेडा 500 रू.
31) रविंद्र जगताप सर नांदेड 350 रू.
32) श्री. सुधाकरजी चपंतराव सावसाकडे यवतमाळ 500 रू.
33) श्री. मुरलीधर सुभाष चौके चिचघाट 200 रू.
34) श्री. शरद शंकरराव नन्नावरे सावली 500 रू.
35) श्री. अमोल खरुरकर मांडवा 200 रू.
36) श्री. मोरेश्वर भास्कर चौधरी बेलगांव 500 रू.
37) सौ. कल्याणी मॅडम, वरोरा 200 रू
38) श्री. प्रफुल्ल दामोधर ढोणे .251 रू.
39) श्री. रामेश्वरजी विठ्ठलरावजी कापट 1000 रू.
40) श्री. केशवजी भाऊरावजी ठोंबरे 1000 रू.
41) श्री. अक्षयजी अशोकराव गटलेवार 500 रू.
42) श्री. धिरजजी पुंडलिकराव वैद्य 500 रू.
43) श्री. शशिकांतजी घनश्यामराव लोळगे 501 रू.
44) श्री. पांडुरंगजी विरदंडे सर, मांडवा 1000 रू.
45) श्री. तेजस राजेंद्रप्रसाद तिवारी 500 रू.
46) माया शामरावजी हलवले 500 रू.
47) श्री. संजयजी मधुकरराव जवळकर 500 रू.
48) अर्चना वामनराव गडलींग चिचघाट 500 रु.
49) अश्विनी बबनराव दांडेकर चिचघाट 500 रू.
🙏🏻🙏धन्यवाद🙏🙏
एकुण जमा निधी 27556 रू.

Thursday, September 15, 2022

चेवनिंग स्कॉलर ऍड. दीपक चटप यांची मॅजिकला भेट

चेवनिंग स्कॉलर ऍड. दीपक चटप आणि ग्रामपरिवर्तक - अविनाश पोईनकर यांची मॅजिकला भेट.
🙏
दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून 45 लाख रुपयाची चेवनिंग स्कॉलरशिप मिळवलेले आणि आपल्या विविध रचनात्मक कामातून समाजात परिणामकारक बदल घडवणारे ऍड. दीपक चटप आणि तसेच पोम्भूर्णा तालुक्यातील घाटकुळ गावाला आदर्श गाव म्हणून नावलौकिक प्राप्त करून देणारे चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत युवा कवी, लेखक, मुक्त पत्रकार, आदर्श शाळा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक अविनाश पोईनकर यांनी, सोबतच पत्रकार व प्रगतशील शेतकरी हबीब शेख यांनी मॅजिकला भेट दिली.* त्याअगोदर कला वाणिज्य महाविद्यालय, भिसी येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये दीपक चटक यांनी विद्यार्थ्यांना प्रदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
सामाजिक जाणिवा जोपासत जीवनात यशस्वी होण्याण्यासाठी अनेक कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी माजी राज्यमंत्री आदरणीय डॉ. रमेश कुमार गजबे, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाने सर उपस्थित होते. मॅजिक भेटी दरम्यान त्यांनी मॅजिक विद्यार्थ्यांची संवाद साधला व विविध उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. स्पर्धा परीक्षा सोबतच नामांकित संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले मॅजिक व इतर विविध उपक्रमाचे कौतुक करत कायदा व कायद्याचे शिक्षण यासंदर्भात मदत करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

मॅजिकला भेट दिल्याबद्दल आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल ऍड. दीपक चटप, अविनाश पोईनकर, हबीब शेख मॅजिक परिवाराच्यावतीने मनापासून आभार.
💐🌷🌷👏👏👏👏👏👏

Tuesday, September 13, 2022

जमाखर्च हिशोब.

  ।। जय मॉ मानिका ।।                                                                                   ।। जय बिरसा ।।

आदिवासी  माना जमात विद्यार्थी युवा संघटना  महाराष्ट्र,

जिल्हा शाखा - वर्धा

 कार्यालयीन पत्ता : श्री. भास्करराव चौके यांच्या घरी, गजानन नगर

 वर्धा , ४४२००१ (महा.)  मोबाइल नंबर  : ९०७५९४९७९८.

Ref. :                                                                                 Date : १०-०९-२०२२

• जमाखर्च हिशोब. •

स्व. कुमार गोविंदा राजेश गडमडे यांच्या उपचारासाठी समाजबांधवानी केलेली आर्थिक मदत आणि त्या मदतीचा जमाखर्च हिशोब.

             कुमार गोविंदा राजेश गडमडे मु. वडगाव ता. वरोरा जि. चंद्रपूर ०७ ऑगस्ट २०२२ पासुन ब्रेन ब्लॉक या आजारामुळे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथे भरती होता, त्यांच्या परिवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनसुद्धा त्यांनी १ लाख १० हजार रुपये इतका खर्च स्वबळावर गोविंदाच्या उपचारावर केलेला होता, शासकीय योजनेतील पैशेसुद्धा खर्च होऊन कमी पडले होते, त्यामुळे त्यांच्या परिवाराची हिम्मत खचून गेली होती. त्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी, त्यांची हिम्मत वाढवण्यासाठी समाजबांधवानी तसेच वडगाव गावकऱ्यांनी मदत केली तसेच गोविंदाची लवकरात लवकर तब्बेत बरी होण्यासाठी प्रार्थनासुद्धा केली होती. पण स्व. कुमार गोविंदा राजेश गडमडे यांच्या शरीराने साथ न दिल्यामुळे २२/०८/२०२२ ला सकाळी ठिक ०७:३० वाजता ब्रेन ब्लॉक या आजाराने दुखद निधन झाले. गोविंदाच्या आजार दुरुस्तीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल समाजबांधवांचे तसेच गावकऱ्यांचे आभार....

स्व. कुमार गोविंदा राजेश गडमडे यांच्या उपचारासाठी समाजबांधवानी केलेली आर्थिक मदत आणि त्या मदतीचा जमाखर्च हिशोब खालील प्रमाणे.

एकूण जमा रक्कम            =  91,878 /- ( एक्यान्नव हजार, आठशे ,अठ्याहत्तर रुपये )

उपचाराला दिलेली रक्कम  -  40,000 /- ( चाळीस हजार )

सद्याची शिल्लक रक्कम    =  51,878 /- ( एक्कावन हजार आठशे अठ्याहत्तर )

सदर शिल्लक रक्कम 51,878 ₹ आरोग्य सेवा प्रमुख जिल्हा शाखा वर्धा यांच्याकडे जमा असून भविष्यात आरोग्याची समस्या जाणवल्यास खर्च करण्यात येईल. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून दीड लाख रुपयाचा लाभ  मिळवून देण्यासाठी विद्यार्थी संघटना प्रयत्नशील आहे. 

सर्व देणगीदार व समाज बांधवांनी नोंद घ्यावी......धन्यवाद.       

 आपला.

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा



Monday, August 29, 2022

"पैदागिर" टिमची मॅजिकला सदिच्छा भेट

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कृत चित्रपट "पैदागिर" टीमची मॅजिकला सदिच्छा भेट.

         आज दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी "पैदागिर" टीमने मॅजिकला सदिच्छा भेट दिली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक व प्रसिद्ध कलाकार संजय जिवने सर, चित्रपटाच्या निर्मात्या वंदना जीवने, तेलंग मॅडम व इतर सहनिर्माते, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सांची जीवने, बालकलाकार जय भगत, गवई सर व इतर कलाकार आणि मार्गदर्शक रविकांत गौतमी, सर बागडे सर व बागडे मॅडम उपस्थित होते.
"पैदागीर" या चित्रपटांमध्ये आई व तिच्या बाळाची शिक्षण घेत असतानाची संघर्षाची कथा अतिशय वास्तविकपणे मांडण्यात आलेली आहे. या चित्रपटाला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. सोबतच जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा "कान्स चित्रपट महोत्सवामध्ये" या चित्रपटाला गौरवण्यात आलेले आहे. तसेच या चित्रपटाला "सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपट" म्हणून गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सांची जीवने हिला "दादासाहेब फाळके सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा" पुरस्कार मिळालेला आहे.
         या चित्रपटातील सर्व कलाकार स्थानिक नागपूर व विदर्भाचे असून सामान्य कुटुंबातील आहे. या चित्रपटातील बालकलाकार जय भगत हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याची आई कपड्याच्या दुकानात काम करते. तर जय हा प्राथमिक घेत आहे. तो अतिशय हुशार असून यावर्षी तो शाळेतून प्रथम क्रमांकाने पास झालेला आहे. स्वतः त्याचा व त्याच्या आईचा शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे.
या चित्रपटाला मोठ्या संघर्षाने चार चित्रपटगृह मिळालेले असून हा चित्रपट नागपूर व चंद्रपूरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अधिकाधिक चित्रपट गृह मिळावे यासाठी जीवने सर प्रयत्न करत आहेत. तरी या चित्रपटाचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन मॅजिक परिवार व विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
पैदागिर टीमने मॅजिक उपक्रमाचे अतिशय भरभरून कौतुक केले व या उपक्रमाच्या चित्रफिती बनवण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले.
मॅजिकला भेट दिल्याबद्दल पैदागिरी टीमचे मॅजिक परिवाराच्या वतीने खूप खूप आभार.
👏👏👏👏🙏🙏🙏

Monday, August 22, 2022

दुखद वार्ता

दुखद वार्ता :
-----------------------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम आपल्या संवेदनशील देणगीदार बांधवाचे मनापासुन आभार.
-----------------------------------------------------------------------------------------
आपणास कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, आज सकाळी ठिक ०७:३० वाजता कु. गोविंदा राजेश गडमडे ( मु.वडगाव ) यांचे ब्रेन ब्लॉक या आजाराने दुखद निधन झाले आहे. आपण आर्थिक मदतीच्या रुपात दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे गोविंदाच्या उपचारासाठी एका दिवसात अंदाजे ८४००० ₹ रुपये एवढी रक्कम जमा झालेली होती, त्यामुळे त्याला दवा आणि दुवा या दोन्ही गोष्टिंची कमतरता आपण ठेवणार नव्हतो, पण कु. गोविंदा यांच्या शरिराने साथ दिली नाही आणि दि. २२/०८/२०२२ वार सोमवारला ठिक ०७:३० वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, इथे गोविंदा राजेश गडमडे या १४ वर्षाच्या मुलाने अखेर श्वास सोडला. या दुर्दैवाने झालेल्या गोविंदाच्या मृत्युने सर्वांना , सर्वाच्या मनाला तो खंत लावुन गेला.😞आपणाकडुन आर्थिक मदतीचा मिळालेल्या प्रतीसादामुळे आम्ही सर्व आपले ऋणी आहोत पण आपल्याला आलेल्या अपयशाची खंत सुध्दा आहे.😞😞 प्रकृती त्याच्या आत्म्यास शांती देवो त्यांचा कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
आ. मा. ज. विद्यार्थी युवा संघटना महा, जिल्हा शाखा वर्धा व आपणा सर्वां कडून ....
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐🌷🌷🙏🙏
-----------------------------------------------------------------------------------------

Monday, August 15, 2022

दैनिक नवजीवनने घेतली तेजस्विनीच्या कार्याची दखल

भोवळ येऊन पडलेल्या वृध्दाच्या मदतीला सरसावली तेजस्विनी
दैनिक नवजीवनने घेतली तेजस्विनीच्या कार्याची दखल
• साहसी पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे •

Saturday, August 13, 2022

"साहसी - पायल घोडमारे " च्या माणुसकीला सलाम....

• साहसी पायल •
" साहसी - पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे " च्या माणुसकीला सलाम.👏
         आज दिनांक १३/०८/२०२२, वार - शनिवार ला दुपारी ०३:०० च्या सुमारातील प्रसंग बस स्टॉप जवळ शेगांव (बु.) त.- वरोरा जिल्हा - चंद्रपूर येथील
भारत पेट्रोलियम पंप जवळ पेट्रोल पंपावरून बाहेर निघत होतो. पेट्रोल पंपाच्या बाहेर निघण्याच्या मार्गावरील कडेला बसलेला एक म्हातारा धडकन चक्कर येऊन खाली पडला. बसलेला म्हातारा अचानक पडला म्हणून आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरड केली पण जवळ मात्र कोणी जात नव्हतं. माझ्या सोबत असलेल्या कुटुंबाला बाजूला ठेवून मीच म्हाताऱ्याच्या जवळ जाण्याची हिंमत केली. पडलेल्या म्हाताऱ्याला उठवून बसविला आणि दोन्ही हाताने कान दाबले कुणीतरी पाणी आणा असा आवाज दिला. अस्वस्त म्हाताऱ्याने पटापट उलटी करणे सुरू केली. त्या ठिकाणी शाळकरी सात-आठ मुली होत्या इतर अनेक प्रवासी, दुकानदार होते. त्यातील मुलींनी सी-बाप्पा, सी-बाप्पा म्हणत पळ काढला. इतर लोकांनी दुर्लक्ष केले. मात्र त्याच ठिकाणी असलेली साहस - 2022 प्रशिक्षणाची विद्यार्थिनी कु. पायल उर्फ तेजस्विनी घोडमारे मु. वडधा ता.- वरोरा हिने साहस दाखवत धावत जावून त्या व्यक्तीसाठी पाणी आणून दिले. पाणी पाजल्यानंतर तो म्हातारा शुद्धीवर आला. मात्र त्याच्या सोबतच काय झाले हे त्यालाच माहीत नव्हते. त्यानंतर सर्व हकीकत सांगितली त्याचे सर्व कपडे भरलेले होते. ते धुण्यासाठी सुद्धा पायल आणि त्यानंतर पेट्रोल पंपावरील नोकरांनी मदत केली. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर त्या म्हातार्‍याला विचारले कुठले आपण त्यावर त्यांनी सांगितले.मी हिंगणघाट येथील आहे. चारगाव येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आलो होतो, परत गावाकडे जायचं आहे. त्यासाठी आलो होतो. सर्व व्यवस्थित झाल्यावर निघतो म्हणालो, तेव्हा बाबू चाय घेऊया मग जा. राहू द्या म्हणालो. मदत केल्याबद्दल त्यांनी आमचे धन्यवाद मानले. त्यानंतर पायल सोबत बोललो बाकी मुली नाही जवळ आल्या, पण तूच का पाणी आणून दिलं. " आपल्या घरच जर कोणी असतं, असा प्रसंग आला असता तर आपण पळून गेलो असता का मदत केली असती....मदतच केली असती न सर " तसच, म्हणत हसून उत्तर दिलं.😊
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात हातात झेंडे घेऊन देशभक्तीचा आव आणणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या लोकांपेक्षा जिवंत माणसाला वाचवण्यासाठी दाखवलेली साहसी पायलची माणुसकी कितीतरी पटीने उत्तम आहे.👏👏👏👏
" साहसी - पायल घोडमारे " च्या माणुसकीला सलाम....
विलासभाऊ, पायलचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच..पण तुम्ही सुद्धा कौतुकास पात्र आहात..अडलेल्यांची मदत करणे व आपल्या कृतीतून इतरांनाही प्रोत्साहित करणे हे प्रेरणादायी आहे....तुम्हा दोघांचेही अभिनंदन💐💐💐💐💐💐
                       ✍️ विलास चौधरी (लेखक)
                            (संयोजक - साहस उप्रकम )

Monday, August 1, 2022

गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा - २०२२

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा वर्धा
आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा - २०२२
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा - २०२२
  •                 हिंगणघाट येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा तसेच आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने " शिवशक्ती सभागृह " हिंगणघाट येथे,
    दिनांक ३१/०७/२०२२ वार रविवारला वर्धा जिल्ह्यातील दहावी , बारावी, नवोदय, तसेच स्पर्धा परिक्षा व ईतर परिक्षेमधे गुणवत्ता / यश प्राप्त करणार्‍या माना जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात व्यवसायिक मार्गदर्शन व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.आनंदरावजी जांभुळे सर ( सचिव - आ.माना जमात मंडळ वर्धा जिल्हा ), यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा.श्री. बाबारावजी झापे सर उपस्थित होते.
    कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून,
    मा.श्री.योगेश वानखेडे सर ( Success Academy Wardha ),
    मा.श्री. निलेश नारनवरे सर ( Nature Foundation Nagpur ),
    मा.श्री.श्रीकांत भाऊ ऐकुडे ( अध्यक्ष-Bright Age Foundation ) हे उपस्थित होते.
    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून,
    मा.श्री.रविंद्रजी काळमेंगे सर (आ.मा.ज.वि.यु.संघटना महाराष्ट्र सल्लागार ),
    मा.श्री.रोशनभाऊ चौखे ( माजी जि.प.सदस्य ),
    मा.सौ.जयश्रीताई प्रमोद चौखे ( माजी जि.प. सदस्या ),
    मा.श्री.अरविंदजी बगडे ( शिक्षक हिंगणघाट ),
    मा.श्री.अनिलजी चौधरी ( आ.माना जमात मंडळ हिंगणघाट ),
    मा.श्री.भाष्करजी गुळधे ( सहसचिव - आ.मा.जमात मंडळ हिंगणघाट )
    हे उपस्थित होते.
    या कार्यक्रमात मान्यावरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.व शेवटी अध्यक्षीय भाषण झाले
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.अनिल चौधरी सर यांनी केले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन - सौ.मिनाक्षी नरेंद्र नारनवरे मॅडम व कु.मंगेश चौधरी यांनी केले.
    आभारप्रदर्शन - कु.आकाश बारेकर यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.
    कार्यक्रम आयोजनासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा - वर्धा व आदिवासी माना जमात मंडळ हिंगणघाट यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थी पालक उपस्थित होते,
    त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

Wednesday, June 8, 2022

अंकुर Plan

अंकुर २०२२ ची विद्यार्थीनी कु.तृप्ती जांभुळे पुयारदंड हिने भविष्य वेधी शिक्षणाचा केला कल्पनात्मक अंकुर प्लान.

Wednesday, May 25, 2022

सिताई रोपवाटिका

• सिताई रोपवाटिका •
१५ जुन पासून रोपे उपलब्ध होतील, Advance बुकिंग केल्यास १० % सुट.

Sunday, May 22, 2022

युवा चेतना - २०२२

• युवा चेतना - २०२२ •
कार्यकर्ता चिंतन शिबीर, सालोरी

Saturday, May 21, 2022

• महत्वाची सुचना / Important Intimation •

•महत्वाची सूचना •
कार्यशाळा पुढे घेण्याबाबत
कानून
(महाराष्ट्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी अधिनियम-2003)

(महाराष्ट्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी अधिनियम-2003) कार्यशाळा दिनांक 22 मे ते 23 मे 2022 ला कानुन प्रशिक्षण करीता, नोंदणी केलेल्या समाजबांधवासाठी आयोजित केली होती. परंतु काही कारणास्तव / अडचणीमुळे सदर कार्यशाळा 22 व 23 न घेता पुढे घेण्यात येणार आहे. तरी सर्व रजिस्ट्रेशन केलेल्या समाज बांधवांनी नोंद घ्यावी......

संदर्भाने काही प्रश्न असल्यास
                         संपर्क : 8208580059

Friday, May 20, 2022

सिताई रोपवाटिका, सुसा

• सिताई रोपवाटिका, सुसा •
सुसा, ता.- वरोरा, जिल्हा - चंद्रपूर.

मा.डॉ. रमेशकुमार गजभे शिक्षा संकुल पुयारदंड (भिसी)

• फलकाचे अनावरन •
मा.डॉ. रमेशकुमार गजभे शिक्षा संकुल पुयारदंड (भिसी)
मॅजिक, अंकुर, साहस, कानून हे आमच्या सहकारी कंपनीचे ब्रँड आहेत. हे ब्रँड शिक्षण, प्रशिक्षण आणि लोकनिर्माणाशी संबंधित असल्याने अगदी कमी कालावधीत प्रसिद्ध झालेत. या सर्व ब्रँडचे सर्वात मोठे भागीदार आहेत. आमचे दादा उर्फ सन्माननीय डॉ. रमेश कुमार गजबे (माजी राज्यमंत्री). 1995 मध्ये त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना केली होती. 2018 नंतर कोणताही वृद्ध आश्रमात रहात नसल्याने त्यांनी उभ्या केलेल्या करोडो रुपयाच्या काही वास्तू रिकाम्याच होत्या. याचा मॅजिक उपक्रमासाठी सुयोग्य वापर करता येईल का? या संदर्भात त्यांना आम्ही 2017 मध्ये विचारणा केली होती. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या नैसर्गिक पद्धतीने होकार देत "इथे जे चांगलं करता येईल ते करा" असे निरागस पणे सांगितले. आजही तेच बोलतात. आश्रमातील करोडो रुपयांच्या वास्तू आणि अनेक वस्तू त्यांनी या उपक्रमासाठी विनाशर्त मोफत उपलब्ध करून दिल्या. या अमूल्य सहकार्याविना आणि अभयदादांच्या पुढाकारावीणा मॅजिक-अंकुर-साहस-कानून ब्रँड निर्माण व्हायला फार उशीर आणि त्रासदायक झाले असते. किंवा निर्माणच झाले नसते कदाचित. आजच्या युगात वडील स्वतःच्या मुलाला संपत्तीतील वाटा द्यायला कचरतात. संपत्ती निर्मितीच्या आणि त्याला कवटाळण्याच्या या युगात आमचे दादा फारच वेगळे आहेत. हा परिसर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी किंचितही विचार केला नाही. आज शेकडो मुले याचा लाभ घेत आणि घेणार आहेत.
             मॅजिक उपक्रम सुरू होऊन अडीच वर्ष झालीत. बॅनरबाजी-फलकबाजी याची मुळातच गरज नसल्याने आमच्याकडून निसर्गतः त्याकडे दुर्लक्ष झाले. ब्राईटएज फाऊंडेशनचे बॅनर त्याच्या स्थापनेपासून तीन वर्षानंतर बनवले एवढी आमची समयसूचकता 😄. मॅजिकला भेट देण्यासाठी इच्छुक असणारे व्हिजिटर्स यांनी नेहमी तक्रार होती, की ईकडे यायला रस्ता गवसत नाही. मुख्य रस्त्यावर फलक लावा. अशा सूचना त्यांच्याकडून अनेकदा आल्या. असा फलक लावण्यासाठी आम्ही फक्त दोनच वर्षांनी घाई करतोय 😄. या फलकावर सुरुवातीला काय लिहावे ? असा विचार मनात घोळत होता. या परिसराला दादांचं नाव द्यावे असा विचार मनात आला. याला अनेक सहकाऱ्यांनी संमती दर्शवली. यासंदर्भात काल आम्ही दादांशी बोललो. "मी माझ्या नावासाठी काम करत नाही किंवा त्यासाठी मी हा परिसर उपलब्ध करून दिला नाही" असे म्हणत त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आमचे सहकारी संदीप भाऊ चौधरी यांना पण तसे मी कळवले. आपण जर त्यांचे नाव टाकले तर दादा नाराज होतील का? यासंदर्भात आम्ही विचारविमर्श केला आणि शेवटी हट्टाने ठरवले कि त्यांची नाराजी पत्करून आपण दादांचेच नाव द्यायचेच असे निश्चित केले. आमचे सहकारी नेताजी भाऊ यांच्या सहकार्याने फलक छपाई करून घेतला. आणि आज शंकरपूर-भिसी या मुख्य मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. "मा. डॉ. रमेश कुमार गजबे शिक्षा संकुल पुयारदंड भिसी." आणि त्याच्या खाली सहकारी कंपनीचे ब्रँड. बघुयात आता किती शिवा खाव्या लागतील 😄.


Wednesday, May 18, 2022

मुग्दाई बिग्रेड टीम


मुग्दाई बिग्रेड टीम - सावरला त. चिमूर जिल्हा. चंद्रपूर 👏

आज दिनांक 17 मे 2022 रोज मंगळवार ला रात्रौ.8-00 वाजता मुग्दाई ब्रिगेड टीम बनविण्यासाठी सभा घेण्यात आली.

समाजामध्ये तरुणीं / महिलांचे स्वतंत्र संघटन सुध्दा असावे.
त्यामध्ये

  • 1. महिला आर्थिक व सामाजिक सुरक्षा.
  • 2. महिला आरोग्य.
  • 3. उच्च शिक्षणसाठी संधी उपलब्ध करून देणे.
  • या उद्देशाने भविष्यात विविध प्रशिक्षणे / शिबीर / कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करून तरुणी / महिला साठी स्वतंत्र काम करता यावे यासाठी संघटनात्मक गरज लक्षात घेऊन सभा घेण्यात आली.
  • सभेला मार्गदर्शक - विलास चौधरी, आदिवासी प्रकल्प कार्यालय चिमूर संघटक, प्रफुल - भरडे, कार्यकर्ते अंकित नन्नावरे व भूषण श्रीरामे व गावातील तरुणी, महिला उपस्थित होत्या. सोबत यावेळी आदिवासी विकास विभागा तर्फे राबविल्या जाणाऱ्या 30 दिवशीय निवासी पोलीस पूर्व प्रशिक्षणाची मुलींना माहिती देण्यात येऊन इतर आवश्यक विषयावर सुध्दा चर्चा करण्यात आली.
    यावेळी उपस्थित राहून चांगले सहकार्य करणाऱ्या सर्व मुली / महिलांचे मनपूर्वक धन्यवाद.

  • मुग्दाई ब्रिगेड टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

    Tuesday, May 17, 2022

    अंकुरसाठी निवासी वेळ देणारे कार्यकर्ते


    * अंकुर - 2022 - प्रशिक्षण * शिबिर *
    * अंकुरसाठी निवासी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी *

              दिनांक           -     कार्यकर्त्यांचे नाव   


       01) 16 मे ते 18 मे    भूषण श्रीरामे, गिरड

       02) 16 मे ते 21 मे    प्रदीप चौधरी,पोहा

       03) 16 मे ते 24 मे    सुधाकर चौखे (अंकुर गुरू)

       04) 17 मे ते 18 मे    राजू केदार (अंकुर गुरू)

       05) 17 मे ते 21 मे    संदीप धारने, मासळ

       06) 17 मे ते 15 जून    प्रमोद ठोंबरे (अंकुर गुरू)

       07) 19 मे ते 20 मे    अमोल चौधरी, पुजई

       08) 19 मे ते 20 मे    उमेश दोहतरे

       09) 20 मे ते 22 मे    निखिल राणे, सुसा

       10) 21 मे ते 22 मे    अतुल श्रीरामे

       11) 21 मे ते 24 मे    प्रफुल ढोके, आलेसुर

       12) 21 मे ते 24 मे    कैलास ढोणे, आलेसुर

       13) 23 मे ते 30 मे    भाऊराव घरत

       14) 24 मे ते 31 मे    राजू श्रीरामे, खेमजई

       15) 26 मे ते 27 मे    जगन्नाथ नन्नावरे, चंदनखेडा

       16) 27 मे ते 30 मे    मे सचिन सोनवणे

       17) 28 मे ते 29 मे    रणजित सावसाकडे, शंकरपुर

       18) 28 मे ते 29 मे    नंदू जांभुळे, चरुर

       19) 29 मे ते 30 मे    रामचंद्र दोडके

       20) * प्रत्येक रविवार व सोमवार रोशन जांभुळे, शंकरपूर*

    👉 * अंकुर * ला फुलवण्यासाठी अमूल्य वेळ या सामाजिक कार्यात देण्याऱ्या सर्व समाजबांधव व कार्यकर्त्यांचे
        मनपूर्वक आभार *
    👏👏👏

    उपक्रम व त्याचा उद्देश

    उपक्रम व त्याचा उद्देश समजून घेतला. त्याबद्दल दिवाकर भाऊचे मनापासून आभार👏

    ✍️ दिवाकर मानगुळधे, चंद्रपूर

    👍👍👍
    • ब्राईटेज फाऊंडेशन (मॅजिक) चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
      पहिल्यांदाच जे जे उपक्रम राबवित आहे ते वास्तविकतेला धरुन आहे. अशा हितकारक उपक्रमामुळे उत्साह आणि मनोबल वाढायला स्वाभाविक आयुष्याच्या जडणघडणीत मोलाची ठरेल यात शंका नाही. ब्राईटेज हि समाज सेवाभावी संस्था त्यांच्या नावारुप काम करीत आहे. हे खास उल्लेखनीय आहे. असे काम फक्त हित साधणारी मानसेच करु शकतात. नाहीतर आज स्वार्थाने जिकडे तिकडे सर्वच पोखरलेले असतानाही. आपणही काही समाजाचे देणे आहे या शुध्द भावनेने जे आज ब्राईटेज काम करीत आहे. ते कौतुकास्पद आहे. या एक दोन महिण्यापासुन अंमलात आणलेल्या संकल्पना म्हणजे कानुन, साहस, अंकुर यामध्ये आपण आज काय करु शकतो यापेक्षा भविष्यात घडणाऱ्या प्रसंगात कसे टिकाव धरू शकतो हे प्रामुख्याने सांगण्याचा किवा शिकवण्याचा जो एक अर्थ या संकल्पनेत दडलेला आहे, असे मला वाटते. कानुन म्हणजे कायदा हा सर्वाच्या शिक्षणाचा विषय नसला तरी तो समाजाच्या जाग्रृतेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करुन या कायद्याचे महत्व किती मोठे आहे हे बिगरलाॅच्याही समाज बांधवांना पटवुन दिले आणि त्याचे मनोबल वाढविले. हेही अशक्य काम शक्य करुन दाखविले. यांने नक्कीच त्या व्यक्तीमध्ये वा समाजबांधवामध्ये एखाद्या कार्यालयात किवा सार्वजनिक जिवणात पुढच्या व्यक्तीला कामास विलंब का ? अडले कोठे ? मनण्याचे धाडस निर्मान होईल व बिना झीझक त्या अधिकार्याला काम करण्यास बाध्य करेल यात शंका नाही. साहस सारख्या उपक्रमाची महिलाना / पुरुषाना नितांत आवश्यकता आहे. या उपक्रमाचे सुध्दा आपण आयोजन केलेत आणि हा सुध्दा उपक्रम तुम्ही मोठ्या कष्टाने परिश्रमाने यशस्वी करुन दाखवला. या मधुन तुम्ही दाखवुन दिले की अत्याचाराला बळी पडण्यापेक्षा आत्म सुरक्षा कशी करायची प्रसंगावधान कसे राहायचे. शक्ती पेक्षा युक्ती बरी मनतात ना. या मधुन तंतोतंत खरे दिसते. महिलांनी अबला बनुन कोणीतरी वाचवेल या भ्रामक कल्पनेत न राहता आपण किती सक्षम आहोत. या साहसच्या माध्यमातुन दाखवुन दिले. प्रसंगावधान राखणे आणि संकटाचा सामना करणे, ईतके मनोबल उंचावण्यास तरी या साहसचा नक्कीच आमच्या माय बहिणाना याचा उपयोग होईल. अंकुर संकल्पनाच नाही तर समाज जडणघडणीचा एक पिलर आहे. या पिलरला मजबुत करण्याचे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच नाही तर ती एक जबाबदारी आहे. आजचे हे अंकुर ऊद्याला व्रृक्ष कसे बनेल ? यांचे भान प्रत्येक पालकांनीच नाही तर समाजबांधवानी घ्यायला हवे. व्रृक्ष सरळ वाढणारा हवा की फांद्या करणारा हे या अंकुरावरुन ठरत असले तरी त्या फांद्या वाढवण्याचे काम सर्वाचेच आहे असे मला वाटते. (सरळ म्हणजे स्वार्थ बाळगणारा सावली नसलेला,फांद्या असणारा म्हणजे सावली देणारा उपयोगी पडणारा या अर्थि) आज या अंकुरा ला एक मार्ग मिळेल, मला कसे वाढायचे ? आणि या मार्गदर्शनातुनच एक अनोखी जिद्द घेऊनच आपला मार्ग शोधण्याचे बाळकडू म्हणजेच अंकुर ठरेल यात शंका नाही. असेच या ब्राईटेज सेवाभावी संस्थेचे अंकुरातुन वटव्रृक्ष होवो, अशी या उपक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लिहिण्यात कोणत्या चुका झाल्या असेल तर क्षमा मागतो.

    ✍️_ दिवाकर मानगुळधे, चंद्रपूर _✍️

    अंकुर - २०२२

    " अंकुर " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १४ मे ते १४ जुन, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.
    " अंकुर " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १४ मे ते १४ जुन, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.

    Thursday, May 12, 2022

    प्रशिक्षणातील काही क्षण

    " साहस " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १० मे ते १४ मे, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.
    * साहस प्रशिक्षणातील लाटी शिकविताना प्रशिक्षक *
    " साहस " प्रशिक्षण, आयोजक :- ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर & आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ , दिनांक : १० मे ते १४ मे, स्थळ : मातोश्री वृद्धाश्रम पुयारदंड.

    Wednesday, May 11, 2022

    * प्रशिक्षणाचा दुसरा दिवस *

    * साहस -2022 *
    * तूच कर तुझे रक्षण * .......................................................................................................................
    प्रशिक्षणाच्या दुसर्‍या दिवशी,
    मा.दीपा चावरे मॅडम (उद्योजक बुट्टीबोरी) व मा.डॉ.कांचन जांभुळे (आरोग्य अधिकारी, PHC शंकरपूर) या मान्यवरांचे विविध महिला उद्योग व महिला आरोग्य संदर्भात मार्गदर्शन झाले.
    सोबत शिबिरात सहभागी तरुणींनी ची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सोबत मॅजिक उपक्रमाची पाहुण्यांनी पाहणी केली.
    * धन्यवाद *👏👏👏👏

    Tuesday, May 10, 2022

    " साहस " या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा

    * साहस -2022 * * तूच कर तुझे रक्षण *
    आज दिनांक 10 मे 2022 रोज मंगळवारला "साहस" या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. *या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, उद्घाटक- आंबोली गावच्या सरपंच शालिनीताई दोहतरे, प्रमुख पाहुणे- सम्यक विद्यार्थी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभमभाऊ मंडपे व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राहुलभाऊ दडमल उपस्थित होते.* या शिबिराला आतापर्यंत 70 मुलींनी उपस्थिती दर्शवली आहे. *साहस प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी योगदान ,सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक धन्यवाद*👏👏👏👏👏👏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

    Thursday, May 5, 2022

    हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख

    हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख..........
    एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे चंद्रपूरच्या शाळेत येणे बंद झाले. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून निशा दडमल या शिक्षिकेने वसा उचलला आहे. शाळा झाल्यावर 16 किलोमीटर दूर ताडोबाच्या घनदाट जंगलात असलेल्या मामला गावात त्या जातात. बाजूच्या दुधाळा या गावातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत जाण्यासाठी डॉक्टर अभिलाशा गावतुरे मॅम यांच्या सहकार्याने त्यानी ऑटो लावून दिला. हीच खरी सावित्रीच्या लेकीची ओळख या कर्तुत्वाने आज दिनांक 4 मे 2022 ला C.S.T.P.S चे मुख्य अभियंता श्री माननीय पंकज सपाटे सर व ऊर्जानगर चे इतर अभियंता अधिकारीवर्ग यांनी या कार्याची दखल घेऊन सावित्रीची लेक भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या शिक्षिका निशा दडमल मोहुर्ले यांचा आज सत्कार करण्यात आला. 🙏🙏🙏( संदर्भ : Whatsapp ) 🙏🙏🙏

    Wednesday, May 4, 2022

    स्व. विजेंद्र नन्नावरे सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मॅजिकमध्ये वृक्षारोपण

    दिनांक ०४/०५/२०२२ रोज बुधवारला, स्व. विजेंद्र नन्नावरे सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मॅजिकमध्ये वृक्षारोपण
    अष्टपैलू व्यक्तिमत्व, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भचे कार्यकर्ते तथा मॅजिक उपक्रमाचे सहकारी स्वर्गीय विजेंद्रभाऊ नन्नावरे यांचा आज प्रथम स्मृतिदिन. मॅजिकच्या प्रथम तुकडी प्रवेशाच्या प्रक्रियेत त्यांचा उस्फुर्त सहभाग होता. त्यांनी मॅजिकसाठी तब्बल 60 पुस्तके उपलब्ध करून दिली.

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    दिनांक ०४/०५/२०२२ रोज बुधवारला
    स्व. विजेंद्र नन्नावरे सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्यांची स्मृती कायमस्वरूपी जपता यावी यासाठी मॅजिकमध्ये वृक्षारोपण व मौन धारण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
    आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना आणि मॅजिक परिवाराच्या वतीने विजेंद्रभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    Friday, April 29, 2022

    भव्य रक्तदान शिबीर.

    प्रेरणास्थान / सामाजिक कार्यकर्ता यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ.
    भव्य रक्तदान शिबीर.

    आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना बोेरगाव (शि.) व तथा समस्त ग्रामवासीयांतर्फे. भव्य रक्तदान शिबीर, • विशेष सहकार्य :- स्व. विजेंद्र बा. नन्नावरे मित्रमंडळ.
    • सामाजिक कार्यकर्ता :- स्व. विजेंद्र बा. नन्नावरे •
    • दिनांक :- ०४/०५/२०२२ रोज बुधवार ला, • स्थळ :- जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरगाव (शिवणफळ), पोष्ट :- टेमुर्डा, तालुका :- वरोरा, जि.:- चंद्रपूर.

    Thursday, April 28, 2022

    समाजोपयोगी काम

    समाजोपयोगी काम

    माफ करा, यातील काही गोष्टी वाढवून सांगण्यात आल्या आहे जे मला करायचं होतं पण ते शक्य झाले नाही तरी वाढवून सांगण्यात आलेल्या माहिती बाबत माफी मागतो... मंगेश चौधरी, भांखेडा (कोरोना योद्धा) (आ.मा.ज. विद्यार्थी युवा संघटना विदर्भ - आरोग्य प्रमुख)
    माफ करा, यातील काही गोष्टी वाढवून सांगण्यात आल्या आहे जे मला करायचं होतं पण ते शक्य झाले नाही तरी वाढवून सांगण्यात आलेल्या माहिती बाबत माफी मागतो...🙏🏻...✍️ मंगेश चौधरी, भांखेडा (कोरोना योद्धा) (आ.मा.ज. विद्यार्थी युवा संघटना विदर्भ - आरोग्य प्रमुख) .....जी गोष्ट मला करायची होती पण त्यात आपण कमी पडलो, ती वाढवून सांगितली त्याबाबत माफी असावी असे म्हणणारे मंगेश सारखे कार्यकर्ते फार कमी असतात. तुझा त्या प्रामाणिक कबुलीला सलाम. 🙏🙏 पुढील कार्यासाठी शुभेच्छा.🙏🏻...✍️ विलासभाऊ चौधरी......🌷🌷

    Tuesday, April 26, 2022

    " साहस " तुच कर तुझे रक्षण.

    " साहस " प्रशिक्षण.
    तुच कर तुझे रक्षण.

    कानून प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनानंतर
    ब्राईट एज फाउंडेशन व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ आयोजित आहे पाच दिवसीय निवासी , मुलींसाठी "साहस - २०२२" तुच कर तुझे रक्षण......"कार्यशाळा".
        काही थोडक्या जागा शिल्लक आहे......

    Monday, April 25, 2022

    कानून प्रायोगिक कार्यशाळा संपन्न

    "कानून" कार्यशाळा संपन्न.
    झुणका ग्रामशाखेच्या संकेतस्थळाचे अनावरण
    वृक्ष लागवडीने कार्यशाळेचा समारोप
    ( महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2003 )
              आज दिनांक २४/०४/२०२२ रोज रविवारला आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ व ब्राईटएज फाउंडेशन भिवापुर च्या वतीने आयोजित जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात कानून कार्यशाळा,मातोश्री वृद्धाश्रम (मॅजिक ) भीसी येथे संपन्न झाली.
      या कार्यशाळेत प्रा. डॉ. भगवान नन्नावरे यांनी संबोधित केले. या कार्यशाळेला एकूण ८५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.प्रथम कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2003 या कायद्याशी निगडीत पेपर घेऊन करण्यात आली. यात महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2003, शासनाचे विविध परिपत्रक, न्यायालयीन निर्णय, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची कायदेशीर प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या जात वैधता संदर्भात असणाऱ्या विविध समस्या, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

               या कार्यशाळेदरम्यान आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना वर्धा जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मगरे यांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. या संकेत स्थळावर माना जमाती संदर्भातील सर्व घडामोडी व माहितीचे संकलन उत्तम प्रकारे करण्यात आलेले आहे. याचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. https://www.tmtsyogramshakhazunka.blogspot.com या कार्यशाळेचा समारोप नेहमीप्रमाणे वृक्ष लागवड करून करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी संघटनेचे विदर्भ सल्लागार रवींद्र कारमेंगे व हरिदास श्रीरामे प्रामुख्याने उपस्थित होते.
      प्रायोगिक तत्त्वावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विशेषतः नागपूर वस्तीगृहशाखेचे विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
      या सर्वांचे खूप खूप आभार 👏👏👏👏👏👏

    Friday, April 15, 2022

    Wel Come to My Website

    आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ ,
    ग्रामशाखा झुनका
    या माझ्या वेबसाइट ला भेट देणार्‍या
    सर्व मान्यवरांचे मी ज्ञानेश्वर मगरे (जिल्हाशाखा वर्धा - उपाध्यक्ष ) तसेच विदर्भ शाखा, जिल्हा शाखा - वर्धा पदाधिकारी सहर्ष स्वागत करित आहे.
    Wel-Come to my small website-Tribal Mana Tribe Student Youth Organisation Gramshakha Zunka.

    Sunday, April 10, 2022

    मॅजिकचे ग्रंथालय व वाचनालय दर्जेदार करण्याचा निर्धार

    मार्कंडादेव येथील स्नेहमिलन सोहळा निमित्ताने संकल्प
    मॅजिकचे ग्रंथालय व वाचनालय दर्जेदार करण्याचा निर्धार
    🤝🤝🤝🤝🤝

            आज दिनांक 9 एप्रिल 2022 रोज शनिवार ला राजे गहीलू माना समाज संघटना तालुका चामोर्शी चे वतीने मार्कंडादेव येथे स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गिरिधरजी सावसाकडे (शिक्षक), प्रमुख पाहुणे - श्री. धारणे महाराज, श्री. गडमडे महाराज (ह.भ.प) , सावसाकडे मॅडम, श्री. विनोद गडमडे, श्री. प्रा. राजू केदार सर (सल्लागार विद्यार्थी संघटना,विदर्भ) श्री. वाल्मीक नन्नवरे कार्याध्यक्ष (विद्यार्थी युवा संघटना विदर्भ) श्री विलास चौधरी- विदर्भ संघटक उपस्थित होते. पाहुण्याच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित समाजबांधवना समाजाचा इतिहास, समाजाचे संघटनात्मक काम, मॅजिक उपक्रम इत्यादी विषयांवर प्रबोधन करण्यात आले. सोबतच यावेळी संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
    समाजातील विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून राबवण्यात येणाऱ्या मॅजिक उपक्रमातील ग्रंथालय आणि वाचनालयाला सर्व उत्तम दर्जाचे बनवण्याचा निर्धार यावेळी सर्व समाजबांधवांनी व्यक्त केला. यामध्ये अभ्यासाला अनुकूल असणारी रंगरंगोटी करणे, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून माहितीपर कायमस्वरूपी फ्लेक्स बनवणे, इलेक्ट्रिसिटी फिटिंग व उत्कृष्ट आसन व्यवस्था इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत्कुमार मगरे, संचालन विवेक चौके आणि आभार पुंडलिक दडमल यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चामोर्शी तालुक्यामध्ये असणाऱ्या समाज बांधव आणि कर्मचारी मंडळी यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद ....👏👏👏👏👏👏👏

    Wednesday, January 12, 2022

    "एक पुस्तक गावासाठी"

    " एक पुस्तक गावासाठी "
            डॉ एपीजे अब्दुल कलाम वाचनालयाला पुस्तक भेट ( दिनांक १०/०१/२०२२ )
            एक दिवसाचा सरपंच या प्रशंसनीय व परिवर्तनशील उपक्रमाचे शिलेदार असलेल्या आंबोली या गावात युवामंच आणि ग्रामपंचायतीच्या वतीने "एक पुस्तक गावासाठी" हा उपक्रम सुरू आहे.
            या उपक्रमासाठी मदत म्हणून ब्राईटएज फाउंडेशन परिवाराच्या वतीने वाचनालयाला शेती आणि कायदेविषयक पुस्तके भेट म्हणून सहकोषाध्यक्ष ईश्वर हजारे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच शालिनीताई दोहतरे यांच्या कडे सुपूर्द केली.
    यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव ठाकरे, सदस्य शुभम मंडपे, फाउंडेशनचे शैक्षणिक प्रमुख विवेक चौखे, अध्यक्ष श्रीकांत एकुडे युवा मंचाचे सदस्य आशिष चौधरी आणि श्री. वाकडे उपस्थित होते.

    Tuesday, January 11, 2022

    अरे ! असे वादळ ,वारे,पाऊस सारे बहुत बघितले.

    नागदिवाळी महोत्सव आलेसुर ( दिनांक - १०/०१/२०२२ )
    ता.:-भिवापूर, जि. : नागपूर.
    अरे ! असे वादळ ,वारे,पाऊस सारे बहुत बघितले आम्ही.
      🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏
    •         मा.शंकर दडमल ( जि प सदस्य ) यांच्या अध्यक्षीय भाषणाला सुरवात होताच विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी पडायला लागल्या गावातील लोक पाऊस येताच सभामंडपातून पळून जायला लागले,,परंतू ; मा.श्री शंकर दडमल ( जि प सदस्य कारगाव सर्कल ) यांनी सभा मंडप न सोडता अध्यक्षीय भाषणाला सुरवात केली.
      अरे ! असे वादळ ,वारे,पाऊस सारे बहुत बघितले आम्ही. रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंगी निश्चयाचे बळ असे छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सांगायचे. आणि त्याच महाराष्ट्रात मी जन्मलो.
               तुम्हाला मी दोन शब्द सांगायला आलो, आणि ते सांगूनच जाणार. गावात बोलविलेला पाहुणा भर पावसात बोलत असतांना आपण घरी कसे जाणार म्हणून, काही लोक सरांचे भाषण ऐकायला मागे परतले. पावसाचा मारा चालू आणि दडमल सरांचे भाषण चालू,,समाजाला सांगत असतांना बोलले की, असे ऊन, वारा, पाऊस वादळे समोर कितीही आले म्हणून आमच्या समाज बांधवानी भ्यायच काय ?
              अशा वादळी स्वरूपात येणाऱ्या समस्या समाजासमोर येणार तेव्हा काय स्वस्थ बसणार की लढणार. असा संदेश शंकरजी दडमल साहेब यांनी समाजबांधवाला दिला. मंडपाच्या कान्याकोपऱ्यातुन लोक भावूक होऊन भाषण ऐकत होते.भाषण संपल्यावर हा क्षण तुमचा अविस्मरनिय राहील साहेब असे कार्यक्रमस्थळी सर्व बोलत होते. या कार्यक्रमात मा.शंकर दडमल ( जि प सदस्य ) यांचा आलेसुर ग्रामवासीयांमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय दलात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या आई-वडिलांचा मा.श्री शंकर दडमल ( जि प सदस्य ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    • सत्कारमूर्ती :-
    • 1) सचिन कवडू रंदई मु.:-वणी ( आसाम रायफल )
      3) प्रशांत नगराळे मु.:-खापरी ( महार रेजिमेंट,उत्तराखंड )
      3) विवेक जांभळे मु.:-आलेसुर ( MSF जवान )
      4) माधुरी गायकवाड मु.:-आलेसुर ( सहा.पोलिस निरीक्षक, गडचिरोली )
      या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लाभलेले मा श्री रमेशकुमार गजभे ( माजी राज्यमंत्री महा. राज्य ) यांनी मार्गदर्शन करतांना समाजाच्या रूढी परंपरा, व इतिहास यांवर प्रकाश टाकला.
      या कार्यक्रमाला उपस्थित :-
    • उदघाटक :-
    • मा.श्री.डॉ रमेशकुमार गजभे ( माजी राज्यमंत्री महा.राज्य )
    • अध्यक्ष:-
    • मा,श्री शंकर दडमल ( जि.प सदस्य,कारगाव सर्कल)
    • प्रमुख पाहुणे :-
    • श्री. दिलीप दोडके ( सरपंच ,आलेसुर )
      सौ. मंदाताई ढोके ( ग्रा.पं.सदस्य,आलेसुर )
      श्री. राकेश आत्राम ( ग्रा.पं.सदस्य,आलेसुर )
      सौ. बारेकर मॅडम ( ग्रा.पं.सदस्य,आलेसुर )
      श्री. बापूराव नन्नावरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, टेका-मांडवा )
      श्री. रासराज राजनहिरे ( अध्यक्ष-गुरुदेव सेवा मंडळ,आलेसुर )

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :- श्री. सुभाष नन्नावरे सर यांनी केले तर,
      आभारप्रदर्शन :- अंकेश गायकवाड यांनी मानले.
      💐💐💐💐💐💐💐💐

    देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

    देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

    Populer post / लोकप्रिय पोस्ट